
सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावादाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या सीमावादाच्या प्रश्नावर कायदेशीर बाजू मांडण्यासाठी दोन्हीही राज्यांकडून तयारी दर्शवण्यात आली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकला राज्याला इशारा दिला आहे. ते म्हणाले, ''सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट आहे, तरीही कर्नाटक दिशाभूल करण्याचे काम करतेयं. जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गैरवापर करू नये, अशा शब्दात पाटीलांनी सुनावले.
जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, ''जत तालुक्यातील ६४ गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे पाणी तिथे जात नव्हते. मात्र या गावांना पाणी मिळण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक वर्षांपासून मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री या नात्याने मी ११ ऑगस्ट २०२१ ला वारणा नदीच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करण्यास मान्यता दिली. त्यानंतर फेरनियोजनामुळे अतिरिक्त ६ टीएमसी पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे म्हैसाळ प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल ६४ गावांना दिलासा देण्याचे काम आम्ही आघाडी सरकारच्या काळात केल्याते पाटलांनी स्पष्ट केले.
पुढे पाटील म्हणाले, ''मी स्वतः या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यामुळे फार कमी काळात हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला. या प्रकल्पाबाबत महाविकास आघाडीने कोणतीही दिरंगाई केली नाही. आता हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असल्याने मंत्रिमंडळाने तो पुढे घ्यावा आणि त्याला मान्यता देत तो प्रकल्प सुरू करावा, अशी मागणीही पाटलांनी यावेळी केली.
दरम्यान, आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी २०१६ साली मांडली होती. पण त्यानंतर आता या गावकऱ्यांची तशी कोणतीही भावना नाही. त्यामुळे जतचे ग्रामस्थ कर्नाटकाच्या कारस्थानाला बळी पडणार नाहीत'', अशा स्पष्ट शब्दात पाटलांनी आपली भूमिका व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.