राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यानेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांचे वाभाडे काढले; हटविण्याची मागणी

NCP|Balasaheb Patil|VIikas Lawande: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कारभाराबद्दल पवारांना पत्र लिहिले आहे.
Balasaheb Patil & Vikas Lawande
Balasaheb Patil & Vikas LawandeSarkarnama

पुणे : सहकार क्षेत्राला (Cooperative sector) सक्षम करणारा व सहकारातील अपप्रवृत्तीला लगाम लावणारा राज्याला सहकारमंत्री अत्यावश्यक आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा नसावा. अन्यथा सहकार बदनाम होत राहणार व जनतेचा विश्वास राहणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी मागणी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचेही ते ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांना पदावरून हटवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. खुद्द राष्ट्रवादीच्याच प्रवक्त्याने अशी मागणी केल्याने साहजिकच राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होणार आहे. (Balasaheb Patil & Vikas Lawande Latest Marathi News) याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे म्हणणे येताच त्यांची बाजू देण्यात येईल.

Balasaheb Patil & Vikas Lawande
खडसेंच्या पराभवासाठी भाजपला हवीत फक्त तीन मते : महाजन लागलेत कामाला...

लवांडे यांनी सहकारमंत्री पाटलांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा आरोप केला आहे. लवांडे म्हणाले, पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांत सहकारात कुठलाही बदल केला नाही. सहकार क्षेत्राला सक्षम करणारे काम त्यांच्याकडून झाले नाही. उलट दिवसेंदिवस भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. सहकारमंत्र्याच्या या कामामुळे पक्षाचे नाव बदनाम होत असून पर्यायाने शरद पवार आणि इतर नेत्यांवर यामुळे टीका होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आपण राष्ट्रवादी काॅंग्रेसचे असलो तरी सहकार क्षेत्राच्या हितासाठी ही मागणी केल्याचे त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

Balasaheb Patil & Vikas Lawande
अजित पवारांना भाषण नाकारणं ही दडपशाही!

शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात लवांडे यांनी पाटील यांच्याविषयीचा वैयक्तिक अनुभव सांगितला आहे. माझ्या शिंदेवाडी (ता. हवेली) येथील दोन सोसायट्यांच्या विलीनीकरणासाठी मी राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्यासह पाटील यांना भेटलो होतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत या दोन सोसायट्यांचे विलीनीकरण होणे आवश्यक होते. त्यास हवेलीचे पुणे शहर (४) उपनिबंधक यांनी मान्यता दिली होती. मात्र भाजपच्या काही मंडळींनी या विरोधात स्थगिती मिळवली व आदेश रद्द केला. त्याविरुद्ध मी सहकारमंत्री पाटील यांच्याकडे रिव्हीजन अर्ज केला होता.

याकामी गेल्या 7 ते 8 महिन्यांत मी व स्थानिक राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मंत्री महादेयांकडे वारंवार पाठपुरावा करून सहकार्य करण्याची अपेक्षा केली होती. एवढेच नाही तर शरद पवार साहेबांनी आमच्या समक्ष मंत्री महादेयांना फोन वरून सूचना केली. मात्र मंत्री पाटील यांनी उलट कार्यवाही केली व सहनिबंधकांना सांगून आमच्या अपेक्षेविरुद्ध निर्णय दिला. यात 'अर्थपूर्ण' कार्यवाही झाल्याचा संशय असल्याचे मत लवांडे यांनी पवार यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

सहकारमंत्र्यांना लवांडे यांचे सवाल

माझे काम बेकायदा किंवा नियमबाहय होते काय?

आपण सहकार्य न करण्याचे कारण काय?

भाजपाला सहकार्य करण्याचे कारण काय?

सुनावणी न घेण्याचे कारण काय?

मी पक्ष प्रवक्ता व जबाबदार कार्यकर्ता असून पूर्णवेळ कार्यरत असतो आणि भाजपाला दररोज अंगावर घेत असतो. पक्षसंघटना बळकट व्हावी यासाठी सक्रीय असतो. मग पक्षाचे मंत्री आम्हाला सहकार्य करत नाहीत उलट काम करतात. याचा आम्ही काय अर्थ घ्यावा?

Balasaheb Patil & Vikas Lawande
देहूतील कार्यक्रमवार अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, पण फक्त ६ वाक्यातच!

लवांडे पुढे म्हणतात, ``मी सहकारमंत्र्यांच्या कामकाज पद्धतीची माहिती घेतली असता त्यांचे कामकाज जवळून पाहिले. ते अकार्यक्षम व स्वतः पुरते पाहणारे आहेत. बदल्यांबाबत सेटिंग केले जाते. याबाबत प्रशासनात चांगले मत नाही. भाजप सरकार काळातील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे स्वीय सहाय्यक आपल्या सहकारमंत्र्यांचे कायम कसे राहू शकतात?

Balasaheb Patil & Vikas Lawande
हिंमत असेल तर समोरासमोर या : उदयनराजेंचे अजितदादांना खुले आव्हान!

आपल्या महाविकास आघाडीचे सरकार येऊन २ वर्षे झाली. मात्र सहकार खात्याकडून एकही नवीन सकारात्मक पध्दतीची योजना नाही किंवा नाविन्यपूर्ण सहकार संस्था बळकटीकरणासाठी काम नाही. कोणतेही नवीन धारेण आखलेले नाही. एकीकडे केंद्रात सहकार मंत्रालय सुरू आहे. त्यावेळी सक्षमपणे आपण भाजपला तोंड देऊ शकू का, असा प्रश्न आहे. आधीच आपला पक्ष सहकारातील काही अपप्रवृतींच्या लोकांमुळे बदनाम आहे. ती मलीन प्रतिमा सुधारण्यामागे सहकार मंत्र्याकडे कोणता कृतीकार्यक्रम आहे ? सहकार प्रशासनातील कामकाज व् सेवासुविधा कालबाह्य आहेत. त्याबाबत कोणताही कार्यक्रम नाही. सहकारमंत्री म्हणून पाटील राज्याला वेळ न देता केवळ सातारा-कराडला वेळ देत आहेत. त्याचा राज्याला व पक्षाला फायदा होत नाही. हे माझे निरिक्षण आहे, असेही लवांडे यांनी म्हटले आहे.

या साऱ्या परिस्थितीत सक्षम व कार्तव्यदक्ष सहकारमंत्री राज्याला हवा आहे. जो राज्याला वेळ देईल आपल्या पक्षसंघटनेला महत्व देईल. सहकारातील चुकीच्या व अपप्रवृलीला राखेल अन्यथा पक्ष प्रतिमा मलीन होऊ शकते. आपण माझी तक्रार सकारात्मक घ्याल ही अपेक्षा आहे, असे लवांडे यांनी आपल्या नेत्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com