Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे 'मिशन सोलापूर' ; पंधरा दिवसांत पवारांसह जयंत पाटील, सुळेंचा जिल्ह्यात दौरा

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सोलापूरवर लक्ष केंद्रीत केले आहे.
Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil News
Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil NewsSarkarnama

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सोलापूरवर लक्ष केंद्रीत केले आहे. कारण या महिन्यात पंधरा दिवसांच्या अंतरात पक्षाचे तीन महत्वाचे नेते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यात खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे २३ ऑक्टोबर रोजी सोलापुरात येणार असल्याची माहिती आहे. ता. २४ ऑक्टोबर रोजी विजयदशमी आहे, त्या अगोदरच सोलापूर दौरा करून राष्ट्रवादीने सिमोल्लंघनाची तयारी केल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी जिल्ह्यात कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.

Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil News
Aaditya Thackeray News : मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले,"...तर लोकसभा निवडणुकही लढवेन!"

त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार गटाने माढा, करमाळा, मोहोळ, माळशिरस या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः माढा लोकसभा मतदार संघातील एक तगडा युवा नेता शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे समजते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पंढरपुरातील विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा, तर माजी महापौर महेश कोठे हे सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील उर्वरित मतदारसंघाबाबत शरद पवारांचे डावपेच काय असणार, हे पहावे लागणार आहे. कोठे आणि अभिजित पाटील यांना संधी मिळेल त्या ठिकाणी ताकद दिली जात आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या (ता.६ ऑक्टोबर) सोलापुरात येत आहेत. अभिजीत पाटील आणि महेश कोठे यांच्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या घरातील लग्नसमारंभासही ते उपस्थिती लावणार आहेत. महेश कोठे यांच्यासारखा चेहरा मिळाल्याने राष्ट्रवादीला प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.

पाटील यांच्यानंतर पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे रविवारी (ता.८ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. माळशिरस तालुक्यातील पानीवपासून त्या दौऱ्याची सुरवात करणार आहेत. शंकरराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट त्या भेट देणार आहेत. त्यानंतर कोठे यांच्यासाठी त्या सोलापुरात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर मोहोळ आणि कुर्डूवाडीत त्या मेळावा घेणार आहेत. कोठे, पाटील हे आमदारकीचे तगडे उमेदवार राष्ट्रवादीकडे (NCP) आहेत. मागील निवडणुकीत माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचा विजय अवघ्या २५०० मतांनी हुकला आहे. मोहोळ, माढा व करमाळा मतदारसंघात शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू आहे. जसजशा निवडणूक जवळ येथील तसतसे हे गुपित चेहरे उघड होण्याची शक्यता आहे.

माढ्याबाबत पवारांचे डावपेच काय असणार?

माढ्यातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळते ? यावर सोलापुरात प्रचंड चर्चा सुरू आहे. शरद पवार गटाकडून माढ्यात कोण असणार याबद्दल सध्या तरी शांतता आहे. या मतदारसंघाबाबत पवारांचे डावपेच काय असणार याची उत्सुकता आहे. सुप्रिया सुळे या मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत कुर्डूवाडीत संवाद साधणार आहेत. तर शरद पवार यांची २३ ऑक्टोबर रोजी माढा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. ती टेंभुर्णीत होण्याची शक्यता आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil News
Punit Balan News : 3.20 कोटी मागणारे प्रशासन झुकले; बड्या नेत्याच्या मध्यस्थीने पुनीत बालन तरले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com