शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड

केवळ एक मताने शशिकांत शिंदेचा पराभव झाल्याने शिंदेंचे कार्यकर्ते आक्रमक
शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदार संघात आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांचा एका मताने पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने संतप्त झालेल्या शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी (NCP) भवनावर दगडफेक करून आमदार शिंदे यांचा जयघोष केला. आमदार शिंदेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून याठिकाणी अजून गोंधळ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार शशिकांत शिंदे एका मताने पराभूत झाले. या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच काही मातब्बर नेत्यांनी शिंदेना पराभूत करण्यासाठी अपक्ष उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना ताकद दिल्याचा आरोप करून शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली.

शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे व अपक्ष ज्ञानदेव रांजणे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रांजणे कट्टर समर्थक आहेत. या निवडणुकीत सहकार पॅनल मधील काही नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला आहे.

या निवडणुकीत शशिकांत शिंदेना विजयी करा, असा निरोप खुद्द शरद पवार व अजित पवार त्यांनी जिल्ह्यातील मातब्बर श्रेष्ठींनी पाठविला होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचाही निरोप प्रमाण न मानता शशिकांत शिंदे यांना पाडण्याचे काम राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला. हा पराभव आपल्याच लोकांनी केल्याचे सांगत सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर तुफान दगडफेक केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in