शिंदे सरकार असंवेदनशील; विमानाने फिरतयं अन् अडीच हजारांची दाढी करतयं!

Supriya Sule|Eknath Shinde : आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या मंदिराला भेट देत विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले.
NCP MP Supriya Sule Latest Marathi News
NCP MP Supriya Sule Latest Marathi NewsSarkarnama

Supriya Sule : शिवसेना (Shivsena) नेते आणि आता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या सोबत सुमारे 40 शिवसेना आमदारांना घेत बंडखोरी केली आणि भाजपच्या समर्थनाने राज्यात सत्तांतर घडवलं आहे. यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. यामुळे राष्ट्रवादी (NCP) आणि कॅाग्रेस (Congress) नेते आता विरोधकांची भुमिका पार पाडतांना दिसत आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या राज्यात नव्याने सत्ता स्थापन केलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिंदे सरकार हे असंवेदनशील असून विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय, अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी आज पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या मंदिराला भेट देत विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.(NCP MP Supriya Sule Latest Marathi News)

NCP MP Supriya Sule Latest Marathi News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा साधेपणा पाहून मानाचे वारकरी नवले दाम्पत्य भारावले...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पांडूरंगाचे आशीर्वाद आणि आभार मानण्यासाठी मी आले आहे. सरकार अस्थिर आहे, दादा म्हणतात ते खरं आहे. लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते. हे दुर्दैवी आहे. शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून आम्ही साथ दिली आणि यापुढेही देत राहणार. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सरकार एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसत आहे. फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजाराची दाढी करतात. मात्र यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी भरडला जातोय. या सरकारला सर्वसामान्यांचं काही देणे घेणे नाही. शिंदे सरकार हे असंवेदनशील असल्याची टीका सुळे यांनी केली.

NCP MP Supriya Sule Latest Marathi News
एकनाथ शिंदे गटातील निवडक बंडखोरांसाठी आदित्य ठाकरेंचा मोठा मेसेज

दरम्यान सुळे यांनी याआधीही शिंदे सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. महाराष्ट्रात नव्या सरकारची सत्ता स्थापन होताच जनतेला वीजदरवाढीचे लगोलग तिसरे गिफ्ट देऊन टाकले. यापूर्वी गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता वीजदरवाढीचे हे तिसरे गिफ्टदेखील जनतेला देण्यात आले. ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in