शिराळ्याला ३० वर्षांनंतर जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद; उपाध्यक्षपद वसंतदादा घराण्याकडे

सांगली जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार नाईक यांची निवड; उपाध्यक्षपदी जयश्री पाटील
Mansingrao Naik-Jayashree Patil
Mansingrao Naik-Jayashree PatilSarkarnama

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक (Mansing Naik) यांची निवड झाली. काँग्रेसकडून (Congress) वसंतदादा पाटील घराण्यातील श्रीमती जयश्री पाटील यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. श्रीमती पाटील यांच्या रुपाने जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदाचा प्रथमच महिला संचालकास बहुमान मिळाला आहे. फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात समर्थकांकडून निवडीनंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बॅंकेचे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता. (NCP MLA Mansingrao Naik as chairman of Sangli District Bank)

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या महाआघाडीच्या सहकार पॅनेलने १७ जागा जिंकल्या होत्या. प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनेलनेही ४ जागांवर विजय मिळवला होता. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाबाबत जिल्ह्यात मोठी उत्सुकता होती. राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा अध्यक्षपदावर प्रबळ दावा होता, त्यामुळे त्यांची निवड ही निश्‍चितच होती.

Mansingrao Naik-Jayashree Patil
अजित पवार म्हणतात...तुम्ही खुशाल पवारसाहेबांकडे माझ्याबद्दल तक्रार करा!

उपाध्यक्षपद हे काँग्रेसकडे होते, जयश्री पाटील, विशाल पाटील यांची नावे चर्चेत होती. उपाध्यक्षपदाचा उमेदवार निवडीचे अधिकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना देण्यात आले होते. त्यानंतर पक्षात झालेल्या चर्चेनुसार उपाध्यक्षपदासाठी श्रीमती जयश्री पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. त्यानुसार त्यांची आज निवड झाली.

Mansingrao Naik-Jayashree Patil
अजितदादांच्या कट्टर समर्थक राजश्री बोरकरांचा जिल्हा बॅंकेसाठी अर्ज : आशा बुचकेही विरोधात लढणार

बँकेच्या राजारामबापू पाटील सभागृहात सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सर्व संचालकांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. आमदार नाईक यांनी अध्यक्षपदासाठी, तर उपाध्यक्षपदासाठी श्रीमती जयश्री पाटील यांचेच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे, सहाय्यक अधिकारी उर्मिला राजमाने, सुनील चव्हाण उपस्थित होते. बॅंकेचे मावळते अध्यक्ष दिलीप पाटील हे आमदार नाईक यांच्या निवडीसाठी सूचक होते, तर अनुमोदन आमदार अनिल बाबर यांनी दिले. श्रीमती पाटील यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून मावळते उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते. तर पृथ्वीराज पाटील यांनी अनुमोदन दिले.

Mansingrao Naik-Jayashree Patil
...तर सरकार कसे चालवायचे? : अजित पवारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, आमदार अनिल बाबर आणि भाजपच्या संचालकांनी अध्यक्षपदासाठी माझ्यावर विश्‍वास दाखवला. या सर्वांनी मला काम करण्याची संधी दिली. बँक आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच, येत्या ११ डिसेंबरपर्यंत बँकेच्या नवीन योजना जाहीर करून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. बँकेचे अध्यक्षपद शिराळासारख्या डोंगरी भागाला ३० वर्षांनंतर मिळाले आहे. शेतकऱ्यांना अभिप्रेत असणारे काम करण्यात येईल. येत्या मार्चपर्यंत थकबाकी वसुलीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ज्या अडचणी असतील, त्या निश्‍चित सोडवल्या जातील,’’ असे आमदार नाईक यांनी निवडीनंतर सांगितले.

‘‘जिल्ह्यातील नेतेमंडळी आणि सर्वच संचालकांनी एकमताने निवड केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. संचालक मंडळाच्या वतीने शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील. महिला बचतगट व त्यांना उद्योगासाठी मदत केली जाईल. स्वर्गीय मदनभाऊंनी जो आदर्श घालून दिला आहे, त्याप्रमाणे चांगले काम केले जाईल,’’ नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्रीमती पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com