डुक्कर कितीही चांगले असले तरी ते गटारातच जाते ; मिटकरी-खोतांमध्ये रंगला 'कलगी-तुरा'

राष्ट्रवादी हा तमाशाचा फड आहे. फड मालक त्याचा आनंद घेत टाळ्या वाजवत आहेत.
amol mitkari, sadabhau khot
amol mitkari, sadabhau khotsarkarnama

सांगली : राष्ट्रवादी काँगसचे नेते, आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) आणि भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांच्यातील 'कलगी-तुरा'संपण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. एकमेंकांना डिवचण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत.

अमोल मिटकरींनी मंगळवारी एक व्हिडिओ शेअर करीत सदाभाऊंची खिल्ली उडवली होती. त्यानंतर सदाभाऊंनी मिटकरींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खोत हे एका कार्यक्रमात बोलत होते. 'डुक्कर कितीही चांगले असले, त्याला साबणाने अंघोळ घातली तरी ते गटारात जाते,'अशा शेलक्या शब्दात सदाभाऊंनी मिटकरींवर निशाना साधला.

amol mitkari, sadabhau khot
भाजपच्या गौळणीने दुसऱ्यांना नाच्या म्हणणं शोभत नाय; मिटकरींचा सदाभाऊंवर पलटवार

सदाभाऊ खोत म्हणाले, 'आमदार अमोल मिटकरी एक चांगले वक्ते होते. वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक विषय मांडले, मात्र डुक्कर कितीही चांगले असले, त्याला साबणाने अंघोळ घातली तरी ते गटारात जाते. राष्ट्रवादीच्या गटार गंगेत ते गेले आहेत,'

सदाभाऊंनी मिटकरीवर टीका करीत राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींवरही तोंडसूख घेतले. ते म्हणाले,'राष्ट्रवादी हा तमाशाचा फड आहे आणि त्यात मिटकरी नवीन नाचा आहे. फड मालक त्याचा आनंद घेत टाळ्या वाजवत आहेत,' सदाभाऊंच्या या टीकेला मिटकरी आता काय उत्तर देतात, हे लवकरच समजेल.

अमोल मिटकरींनी केलेल्या विधानावर ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावरुन सदाभाऊ खोत यांनी मिटकरींनी डिवचलं आहे.

amol mitkari, sadabhau khot
MNS : असा आहे मनसेचा 'आर प्लान'; कार्यकर्ते सज्ज

मिटकरी-खोत यांच्यात रंगलेला 'कलगी-तुरा'

सदाभाऊ खोत :अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. तोडा फोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे.प्रत्येक समाजाची नेते पक्षात घ्यायची, जातीयवाद करायचा आणि पवार साहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचे काम राष्ट्रवादीमधील नेते करतात.

अमोल मिटकरी : सदाभाऊ स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेतात.सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूनं हाती घेतलेल्या माणसासारखी झाले आहे का? जसा पिंजरा चित्रपटात ज्या गुरुजींनी तमाशाला विरोध केला आणि शेवटी त्यांनाच नाचावे लागलं तशी परिस्थिती सदाभाऊंची झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com