राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा हस्तक्षेप व्हायचा; आमदारांना काहीच अधिकार नव्हते... मंत्री देसाईंची खंत

आमदार MLA असताना जेवढा निधी आणला तेवढा राज्यमंत्री Minster of States असताना मला आणता आला नाही, ही खंत आम्ही उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांना सांगितली.
Ajit Pawar, Shambhuraj Desai
Ajit Pawar, Shambhuraj Desaisarkarnama

कऱ्हाड : साताऱा जिल्ह्यात काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा हस्तक्षेप, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप व्हायचा. मतदारसंघाच्या आमदाराला काही अधिकार नसतील तर हे किती दिवस सहन करायचे. म्हणुन आम्हीच ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्यायला भाग पाडले, अशी स्पष्टोक्ती उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, भाजप-शिवसेना युती म्हणुन आम्ही आमदार म्हणुन निवडुन आलो. महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे निवडणुकापूर्वी भाजपचे अमित शहा यांनी जाहीर केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शहा यांना शिवसेनेच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचे का सांगितले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar, Shambhuraj Desai
Karad : कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाच आमदार करा... जयकुमार गोरे

त्याचबरोबर आम्ही निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करणार असे सांगत होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर ठाकरे यांनी आपल्याला महाविकास आघाडी करायची आहे, असे सांगितले. त्यावेळी आम्हाला धक्का बसला. त्या बैठकीत ठाकरे यांनी पक्षाचा आदेश तु्म्हाला मानावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.

Ajit Pawar, Shambhuraj Desai
पाटणकरांना धक्का; मोरगिरीत ६० वर्षांनी सत्तांतर, शंभूराज देसाई गटाची सत्ता

मी राज्यमंत्री होतो, मात्र मला अधिकारच काही नव्हते. आमदार असताना जेवढा निधी आणला तेवढा राज्यमंत्री असताना मला आणता आला नाही, ही खंत आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितली. मात्र त्यांनी आपल्याला तीन पक्षाचे सरकार चालवायचे आहे, असे वारंवार सांगितले.

Ajit Pawar, Shambhuraj Desai
Gram Panchayat Election Result : बड्या पक्षांना धूळ चारत भणंग ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवार विजयी

काम माझे, नारळ राष्ट्रवादीचे...

शासनाकडुन कामे आम्ही मंजूर करुन आणायचे आणि खासदारांनी काम मंजूर झाले की मागील तारखेचे पत्र त्याला जोडुन गावागावांत जावुन काम आम्हीच मंजुर करुन आणले असे सांगायचे. त्यांच्या जोडीला भविष्यात होऊ घातलेले आमदार. त्यांनी जायचे आणि आमच्या कामाचे नारळ फोडुन उपमुख्यमंत्री यांच्याकडुन निधी आम्हीच आणला असे सांगायचे असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in