जिल्हाधिकारी, राष्ट्रवादीने निवडणूक लांबणीवर टाकली : भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

त्यांच्या नगरसेवकांची संख्या धरून निवडणूक लांबवण्याचे षडयंत्र केले जात आहे
bjp
bjp sarkarnama

नवी दिल्ली : नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून सोलापूर आणि नगर हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दोन मतदारसंघ वगळण्यात आले आहेत. त्याप्रकरणी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. सोलापूरचे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबणीवर टाकली, असा आरोप पाटील यांनी केला आहे. (NCP leaders postpone Solapur Legislative Council elections with the help of Collector: Santosh Patil)

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदार संघातील 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यान्वित असणे व मतदार संघातील 75 टक्के मतदार मतदानासाठी पात्र असणे आवश्‍यक आहे. सोलापूर मतदार संघातील फक्त 58 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यान्वित असल्याने सोलापूरची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

bjp
ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी; म्हणून शिवसैनिकाची सहपत्नीक सांगली ते पंढरपूर पायीवारी

दरम्यान, याप्रकरणी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यातील तीन अजून नगरपालिका अस्तित्वात आलेल्या नाहीत. पण, त्यांच्या नगरसेवकांची संख्या धरून निवडणूक लांबवण्याचे षडयंत्र केले जात आहे, असे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

bjp
सतेज पाटलांची भाजपच्या सात नगरसेवकांसह युवा नेत्याबरोबर खलबते!

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबणीवर टाकली, तर विद्यमान मतदारांचे हक्क डावलले जातील. त्यामुळे महापालिकेसह सर्व नगरपालिकांच्या नगरसेवकांची आताचीच संख्या गृहीत धरून ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणीही संतोष पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, मंगळवेढ्याचे नगरसेवक अजित जगताप यांनी निवडणूक आताच घ्यावी, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

bjp
आरआर आबांचा गट पराभवाचा वचपा काढणार की संजयकाका पुन्हा बाजी मारणार?

दरम्यान, आम्हाला मतदानाचा अधिकार दिल्याशिवाय ही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी करत मोहोळ, माढा व माळशिरसमधील नगरपरिषद/नगरपंचायतीमधील भावी नगरसेवकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आमच्या मतदानाच्या हक्कावर गदा आणू नका, विधानपरिषदेची निवडणूक आताच घ्या या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य व जिल्ह्यातील जुन्या नऊ नगरपरिषदांचे सदस्य एकवटले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com