मी मोदी किंवा अमित शहा नाही! रामराजेंचा रणजितसिंहांवर पलटवार

रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोप होत असतात.
मी मोदी किंवा अमित शहा नाही! रामराजेंचा रणजितसिंहांवर पलटवार
BJP MP RanjitSingh Naik Nimbalkar, NCP Ramraje Naik Nimbalkar Latest Marathi NewsSarkarnama

सातारा : जिल्ह्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोप होत असतात. आपली बदनामी करण्यामागे रामराजेंचा हात असल्याचा आरोप रणजितसिंहांनी नुकताच केला होता. त्याला आता रामराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Ramraje Naik Nimbalkar Latest Marathi News)

रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंहांवर टीका केली आहे. माझ्यावर आरोप करणारे तीन पिढ्या आरोपच करत आले आहेत. देशात आणि राज्यात काही घडलं तर शरद पवारांवर आणि जिल्ह्यात काहीही घडलं तरी माझ्यावरच टीका होते. ते उच्च पातळीवर काम करतात. मात्र वृक्षारोपणा पेक्षा त्यांना त्यांच्यावरचे आरोप महत्वाचे वाटत असतील. त्यांना निवडुन दिलय त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने का‌म करावं, असा टोला रामराजे यांनी लगावला आहे. (NCP Leader Ramraje Naik Nimbalkar Criticizes BJP MP Ranjitsingh Naik Nimbalkar)

BJP MP RanjitSingh Naik Nimbalkar, NCP Ramraje Naik Nimbalkar Latest Marathi News
चूक करणाऱ्याला निलंबित करा! अजितदादांनी मनिषा म्हैसकरांसह अधिकाऱ्यांना स्टेजवरच झापलं!

त्यांची खासदारकी घालवायला मी मोदी किंवा अमित शहा नाही. कोणामुळे पद मिळत नाही आणि जातही नाही. त्यांना अवास्थव महत्व देऊन त्यांचा टीआरपी वाढवू नका, असं म्हणत रणजितसिंहांनी आपल्याला खुप त्रास दिल्याचा आरोपही रामराजेंनी केला आहे.

दरम्यान, रविवारी माण तालुक्यातील बोराटवाडी येथे आयोजित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार निंबाळकर यांनी रामराजेंवर निशाणा साधला होता. निवडणुका आल्या की राष्ट्रवादी काँग्रेस अणि फलटणच्या रावणाकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर (Jaykumar Gore) खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात. आताही तसेच षडयंत्र रचले गेले आहे. मात्र, फलटणकरांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. लवकरच आमचा कार्यकाळ सुरु होणार आहे. परमेश्वर त्यांच्याकडे नक्कीच बघणार आहे, अशी कडवट टीका खासदार निंबाळकर यांनी केली होती.

BJP MP RanjitSingh Naik Nimbalkar, NCP Ramraje Naik Nimbalkar Latest Marathi News
काँग्रेसला धक्का दिलेल्या सिब्बलांसह 41 जण बिनविरोध; महाराष्ट्रात राजकारण तापलं

फलटणकरांची आता साठी बुद्धी नाठी अशी अवस्था झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. माण तालुक्यातील काही प्रवृत्ती जिहेकठापूरचे पाणी तालुक्यात येऊ नये; म्हणून प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तींना थारा देवू नका, असे आवाहनही निंबाळकर यांनी या कार्यक्रमात केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in