राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली तानाजी सावंतांची भेट; पंढरपूरच्या राजकारणात पुन्हा खळबळ!

साखर कारखान्याच्या मदतीसाठी काळे पुन्हा पक्षांतर करणार का?, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश करणार की काय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Tanaji Sawant-Kalyan Kale
Tanaji Sawant-Kalyan KaleSarkarnama

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे (Kalyanrao Kale) यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीने पंढरपूरच्या (Pandharpur) राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर काळे यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सावंत यांच्या भेटीमुळे काळे पुन्हा पक्षांतर करणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. (NCP leader Kalyan Kale meet Tanaji Sawant)

मागच्या आठवड्यात आरोग्य मंत्री सावंत हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. ते पंढरपूरमध्ये आले असताना सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्या घरी जाऊन कल्याण काळे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सावंत व इतर नेतेमंडळी उपस्थित होती. सावंत यांची भेट घेतल्याने काळे हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार की काय?, अशी चर्चा पंढरपुरात रंगली आहे.

Tanaji Sawant-Kalyan Kale
शिंदे गटाच्या सोनवणेंची आमदारकी धोक्यात; जयसिद्धेश्वर महास्वामी, नवनीत राणांचे काय?

कल्याण काळे हे पूर्वी भारतीय जनता पक्षात होते. पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याची बक्षिसी म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून काळे यांच्या कारखान्याला थकहमी देण्यात आली होती. तसेच, मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना बदलाच्या हालचाली चालल्या हेात्या. त्यावेळी कल्याण काळे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे आले होते. असे असले तरी पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मात्र त्यांचे सूत जुळल्याचे दिसले नाही. पंढरपूरचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांच्याशी त्यांचा वाद जाहीरपणे झाला हेाता. त्यावेळी त्यांनी आमचे पदाधिकारी आमच्यावर आरोप करतात, अशी खंतही व्यक्त केली हेाती.

Tanaji Sawant-Kalyan Kale
'वाजपेयी, आडवाणींचा पराभव झाला असेल; पण मोदी कधीच पराभूत होणार नाहीत'

दरम्यान, आगामी गाळप हंगाम तोंडावर आलेला असताना काळे यांनी आरोग्य मंत्री सावंत यांची भेट घेतल्याने पंढरपूरच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या मदतीसाठी काळे पुन्हा पक्षांतर करणार का?, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश करणार की काय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com