वाद पेटला! आव्हाड भडकले अन् थेट आमदार महेश शिंदेंची लाज काढली

महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेवरून थेट शरत पवारांवर टीका केली आहे.
Mahesh Shinde, Jitendra Awhad
Mahesh Shinde, Jitendra AwhadSarkarnama

मुंबई : रयत शिक्षण संस्थेवरून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर नव्या वादाला तोंड फुटलं असून आता शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेतेही तुटून पडले आहेत. शरद पवार यांच्या उंचीपेक्षा दोन इंच छोटे असल्याच्या शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) त्यांची लाज काढली. स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ टाक आमदार शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शरद पवारांवर वैयक्तिक टीका करताना काहीजण आपण खूप कर्तृत्ववान आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. एकतर अशा बातम्यांनी टीव्हीवर चमकायला मिळत आणि वृत्तपत्रांमध्येही नाव येतं. कुठल्या गावातला कोण, महेश शिंदे? त्यांची गौरीशंकर नावाची शिक्षणसंस्था आहे. त्यांचे नातेवाईक मदन जगताप यांच्यासोबत 50 टक्के पार्टनरशिप आहे. काय चाललंय या शिक्षणसंस्थेत? स्टाफचा पगार नाही, प्राध्यापकांचा पगार नाही. विद्यार्थ्यांच्या फीचा आतापता नाही. शिक्षणसंस्था चालवायला अक्कल लागते,' अशी टीका आव्हाडांनी केली आहे.

Mahesh Shinde, Jitendra Awhad
भाजपला खिंडार! चार तासांतच मंत्र्यासह पाच आमदारांची 'एक्झिट'

'तुम्ही शरद पवारसाहेबांच्या उंचीपेक्षा दोन इंच छोटे असल्याचे वक्तव्य केलं आहे. पण पवारसाहेब त्यांच्या कर्तृत्वाच्या उंचीने ओळखले जातात. रयत शिक्षणसंस्था ज्या उद्देशाने बनवली होती, त्याचा ज्या पध्दतीने गावागावात पाळेमुळे पसरली, त्यामध्ये फक्त पवारसाहेब होते. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतो आहोत, त्याच्यासमोर आपलं कर्तृत्व किती आहे, हे कधीतरी तपासा. बोलायला तुम्ही कितीही बोलू शकता. पण स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका. तुम्ही उंचीने किती आहात, हा प्रश्न नाही. तुमचा मेंदू कुठे आहे, तेवढा तपासून पाहिले तर बरं होईल,' अशा खरमरीत शब्दांत आव्हाडांनी शिंदेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले आहेत महेश शिंदे?

रयत शिक्षण संस्थेसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना आमच्या लोकांनी आर्थिक ताकद व जमिनी दिल्या. पण, आज काहींनी या संस्थेवर कब्जा केला असून आमच्या जिल्ह्याचं वाटोळं केलं आहे. काही ठराविक कुटुंबाचे राजकारण या शिक्षण संस्थेत आणतायंत. भविष्यात हे चुकीचे राजकारण आपल्याला हुसकावून लावायचे आहे. जिल्ह्यातील संस्था जिल्ह्यातील लोकांच्या ताब्यात राहिल्या पाहिजेत, असे आमदार महेश शिंदे म्हणाले आहेत.

रयत शिक्षण संस्था ही सातारा जिल्ह्याची आमच्या मालकीची आहे. परंतु काहींनी त्या संस्थेवर कब्जा केला आणि आमच्या जिल्ह्याच वाटोळं केल आहे. गेल्या सात ते आठ वर्षात आमच्यातील एकही तरूण त्या रयत शिक्षण संस्थेत कधीही भरलेला नाही. त्यावेळी आमच्या लोकांनी पैसे दिले. आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटलांना आम्ही अर्थिक ताकद दिली. आम्ही जमिनी दिल्या. परंतु काही ठराविक लोक चुकीच्या पध्दतीने कुटुंबाच राजकारण शिक्षण संस्थेत आणतायंत. भविष्यकाळात त्यांच हे चुकीच राजकारण आपल्याला हुसकवून लावलं पाहिजे. जे आमच्या जिल्ह्याची ताकद आहे. ज्या संस्था आमच्या जिल्ह्याच्या आहेत. त्या आमच्या जिल्ह्यातला लोकांच्या ताब्यात राहिल्या पाहिजेत, असेही शिंदे यांनी नमूद केलं होतं.

रयत शिक्षण संस्थेत मुलांच्या शिक्षणासाठी पैसे घेतले जातात. शासनाचे 1540 कोटी रूपये अनुदान येत असतानाही पैसे घेतात ही शोकांतिका आहे. डी. पी. भोसले कॉलेजमध्ये पैसे घेतले जातात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चांगल्या पध्दतीचे व सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी ही संस्था काढली. पण आता त्याच बाजारीकरण चालले आहे. त्यासाठी महेश शिंदे तुमच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल, असे शिंदे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com