Satara Politics| 'दोन्ही राजांनी साताऱ्याचं वाटोळं थांबवावं'; राष्ट्रवादीने पुन्हा डिवचलं

Satara Politics| 35 वर्ष सातारा शहराची नगरपालिका आपल्या हातामध्ये होती. त्यावेळी शिवस्मारक का उभारले नाही.
Satara Politics|
Satara Politics|

सातारा : सध्या यवतेश्वर ते कास या रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवरून आमदार, खासदार यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू आहे. परंतु यांना माझे सांगणे आहे की पहिल्यांदा आपण सातारा शहराचं वाटोळं थांबवावं, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP) जावळीतील नेते दीपक पवार यांनी दोन्ही राजांना लगावला आहे.

सातारा शहर परिसरातील चार भिंती, अजिंक्यतारा, बोगदा, महालदरे ,व पेढ्याच्या भैरोबा, कास येवतेश्वर ही आमची सातारा शहराची (फुफ्फुस)) आहेत. या सर्व परिसराला अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांनी विळखा घातला आहे. तुम्ही मंडळी येवतेश्वर कास रस्त्याबद्दल बोलत आहात. आधी आपल्या शहराचा विचार करा आणि तिथली बांधकाम पाडा. सर्वजण अत्यंत सोयीने बोलत असतात.

Satara Politics|
Pune Festival : पुणे फेस्टिव्हलमध्ये भाजपा आघाडीवर कॉंग्रेस पिछाडीवर !

आमदार म्हणतात की, बेकायदेशीर बांधकामे कायदेशीर करा आणि खासदार म्हणतात की, बाहेरच्या लोकांचे बांधकामे पाडा आणि स्थानिक लोकांची बांधकामे ठेवा. चार भिंती परिसर गिळंकृत झाला आहे ,अजिंक्यताराच्या दरवाजापर्यंत अतिक्रमणाची घरे येऊ लागतील आहेत. बोगदा परिसर, संपूर्ण अतिक्रमीत झाला आहे. येवतेश्वर कास रस्ता हाच खऱ्या अर्थाने निसर्ग संपन्न आणि मोकळा श्वास घेण्यासारखा राहिलेला आहे. हा संपूर्ण परिसर पूर्णपणे उध्वस्त होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निसर्ग आणि पर्यावरण वाचवायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बेकायदेशीर बांधकामे तोडणे गरजेचे आहे.

कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. मध्यंतरी विधानसभेमध्ये आपल्या आमदारांनी गर्जना केली की विधान भवन परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक व्हावे. ही चांगली बाब आहे. माझी आमदार साहेबांना एकच सांगणं आहे की गेली पन्नास वर्षे सातारा शहरांमध्ये आपल्या दोनच कुटुंबाची सत्ता आहे. आपण आपल्या साखर कारखाना अथवा 35 वर्ष सातारा शहराची नगरपालिका आपल्या हातामध्ये होती. त्यावेळी शिवस्मारक का उभारले नाही. त्याच विधानसभेने कायदे मंडळाने कायदे बनवलेले आहेत की जे बेकायदेशीर बांधकाम असेल ते तोडलं पाहिजे.

आपण सांगता बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करा हे कुठल्या तत्वात बसतं. आपले काही कंत्राटी किंवा बगलबच्चे असतील यांची बांधकामं तोडण्यासाठी जर का तुम्ही कायदा मोडत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे. गणपती बसलेले आहेत सणासुदीच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही काही पत्रक बाजी करत असाल तर ती चुकीची आहे आणि तात्काळ थांबवा. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सातारा शहरापासून ते यवतेश्वर ते कास रस्त्यापर्यंतचा बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची मागणी मी करणार असल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in