Satara : साताऱ्यात भाजपला नंबर एक करणार; राष्ट्रवादी हाताच्या बोटावर राहिलीय...

आमदार गोरे Jaykumar Gore म्हणाले, महाविकासच्या Mahavikas Aghadi नेत्यांनी भाजपच्या BJP नेत्यांविषयी बोलले हेही पाहिले पाहिजे. त्यावेळी त्यांच्याही प्रतिमेस जोडे मारले पाहिजेत होते.
BJP MLA Jaykumar Gore
BJP MLA Jaykumar Goresarkarnama

सातारा : देशात आणि राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. आता सातारा जिल्ह्यात पक्ष क्रमांक एकवर आणण्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसह सर्व निवडणुकीत आम्ही चमकदार कामगिरी करणार आहोत. त्यामध्ये निश्चित यश येईल कारण, जिल्ह्यात राष्ट्रवादी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत राहिली आहे, अशी टीका भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत्या ११ नोव्हेंबरला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. याची माहिती देण्यासाठी आमदार गोरे यांनी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे सचिव विक्रम पावसकर, कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, भाजप अंतर्गत कोणतीही खदखद नाही. काम करतात ते समोर दिसतात. काही लोक केवळ चर्चा करतात, त्यांनाही आगामी काळात प्रवाहात घेण्यासाठी पक्ष विचार करेल. आगामी काळात भाजपचे सर्व कार्यकर्ते व नेते एका व्यासपीठावर दिसतील. त्यामुळे विक्रम पावसकर नाराज नाहीत. पावसकर यांच्या पाठीशी पक्ष उभा आहे.

BJP MLA Jaykumar Gore
Maan : जिहे-कटापूर योजना सौर ऊर्जेवर चालविणार... जयकुमार गोरे

सत्तार प्रकरणासंदर्भात बोलताना आमदार गोरे म्हणाले, महाविकासच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांविषयी बोलले हेही पाहिले पाहिजे. त्यावेळी त्यांच्याही प्रतिमेस जोडे मारले पाहिजेत होते. वेडात मराठे वीर दौडले सात.. या चित्रपटाच्या आक्षेपार्ह इतिहासाच्या संदर्भात आमदार गोरे म्हणाले, सगळ्यांनी इतिहासाचा सन्मान राखावा.

BJP MLA Jaykumar Gore
Maan : कॉरिडॉर एमआयडीसी म्हसवडमध्येच होणार... जयकुमार गोरे

सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे मुळगाव भोसरे असून त्याचा उल्लेख चित्रपटात व्हायला पाहिजे. इतिहासाबाबत सगळ्यांनीच भान ठेवले पाहिजे. तसेच वस्तूस्थिती लक्षात ठेवून भूमिका घ्यावी. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीनावर ते म्हणाले, आघाडी सरकारने भाजपवर 'ईडी' सरकार म्हणून केलेली टीका चुकीची आहे. न्यायव्यवस्था सरकारसाठी काम करत असते तर संजय राऊत यांचा जामीन झाला नसता, असेही त्यांनी नमुद केले.

BJP MLA Jaykumar Gore
जामीन मंजूर होताच राऊत आधी गोंधळले, मग भावूक झाले अन् पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in