राष्ट्रवादी हा भरवशाचा पक्ष नाही, एकवेळ काँग्रेस परवडला : चंद्रकांत पाटील

हे माजी खासदार किरीट सोमया आणि भाजपचे यश आहे.
राष्ट्रवादी हा भरवशाचा पक्ष नाही, एकवेळ काँग्रेस परवडला : चंद्रकांत पाटील

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस हा भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक आणि रात्री एक राजकारण करणारा हा पक्ष आहे. कॉंग्रेस एक वेळ परवडला, कॉंग्रेसमधील बहुतांश नेते वेलकल्चर आहेत, हे दरोडेखोर नसतात. राष्ट्रवादीच्या सलगी करण्याच्या डावाला भाजप कधीही भूलणार नाही, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. (NCP is not a credible party : Chandrakant Patil)

आमदार पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी सांगलीतील काँग्रेसचा गड नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादी भाजपशी सलगी करत आहे, या प्रश्नावर पाटील यांनी वरील उत्तर दिले.

एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनात भाजप सहभागी होणार आहे. आतापर्यंत राज्यात 27 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पण, हे सरकार गेंड्यांच्या कातडीचे आहे, असा आरोपही चंद्रकांतदादांनी या वेळी केला.

राष्ट्रवादी हा भरवशाचा पक्ष नाही, एकवेळ काँग्रेस परवडला : चंद्रकांत पाटील
कर्मचाऱ्यांना खात्री पटावी म्हणून आमदारांनी थेट परिवहन मंत्र्यांनाच फोन लावून दिला

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, या सरकारने आधी सचिन वाझेचे समर्थन केले, त्यानंतर वाझे, परमवीरसिंह आणि आता वानखेडे हे भारतीय जनता पक्षाचे पोपट आहेत, असे म्हटले जात आहे. उद्या हे हायकोर्टला भाजपचा पोपट म्हणतील कारण हायकोर्टाने जामीन दिला नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना सरकारला मान्य नाही, त्यामुळे त्यांनी आरोप करावा की वानखेडे हा भाजपचा पोपट आहे.

राष्ट्रवादी हा भरवशाचा पक्ष नाही, एकवेळ काँग्रेस परवडला : चंद्रकांत पाटील
कंगना म्हणते, सुशांतची आत्महत्या नव्हे, तर हत्या

केंद्र सरकार अधिकाऱ्याच्या माध्यमातून वसुली करत आहे, या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारने वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत वसुली केली आहे. आताच एका मंत्र्यांच्या जावयाला मिळालेले 1500 कोटींचे कंत्राट रद्द करावे लागले, हे माजी खासदार किरीट सोमया आणि भाजपचे यश आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 500 कोटी रुपये दिले असते, तर हे कर्मचारी खूष होऊन दिवाळीसाठी घरी गेले असते. शेतकरी अडचणीत आहेत. पण या सरकारला कोणाचेच काही पडलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com