Gram Panchayat Results : आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात उत्तर कराडमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व!

Gram Panchayat Results : सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ६ पैकी ४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.
Gram Panchayat Results balasaheb Patil
Gram Panchayat Results balasaheb PatilSarkarnama

Gram Panchayat Results : कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातल्या एकूण ४९ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाले आहेत. आमदार बाळासाहेब पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात मानणाऱ्या यातील ११ पैकी १० ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर मतदान झालेल्या उर्वरित ३८ ग्रामपंचायती मध्ये लोकनियुक्त सरपंच व सदस्यांसह बाळासाहेब पांडुरंग पाटील (Balasaheb Patil) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ ग्रामपंचायतींवर बहुमताने विजय संपादन करुन निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.

Gram Panchayat Results balasaheb Patil
Grampanchayt Election Result : शिवसेनेच्या मंत्र्यांची कन्या राष्ट्रवादीकडून सरपंच

नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे बाळासाहेब पाटील यांनी फोन करून अभिनंदन केले. मतदार बंधू भगिनींचे आभार मानले. कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील कराड तालुक्यातील २० पैकी १३, सातारा तालुक्यातील १० पैकी ७, कोरेगांव तालुक्यातील ७ पैकी ५,खटाव तालुक्यातील ६ पैकी ४ आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील ६ पैकी ४ अशा एकूण ४९ पैकी ३३ ग्रामपंचायतींवर पाटील समर्थक पॅनेलने विजय मिळवला आहे.

Gram Panchayat Results balasaheb Patil
Grampanchayat : अमरावती जिल्ह्यात देवेंद्र भुयार आणि बच्चू कडूंनी राखली आपली गावे…

विद्यमान आमदार बाळासाहेब पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घवघवीत यश संपादन केले. पाटील यांच्या नेतृत्वामुळे कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com