राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मागासवर्गीय आयोगाची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या नेतृत्वाखाली समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मागासवर्गीय आयोगाची भेट
Nationalist Congress Party delegationSarkarnama

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाला इम्पिरिकल डाटा सादर होत नाही तोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदा व महापालिकेच्या निवडणुका दोन महिन्यात घेण्याचे आदेश दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या नेतृत्वाखाली समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली. ( NCP delegation meets backward class commission )

शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी करतानाच यासाठी राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

Nationalist Congress Party delegation
`ओबीसी`चा इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने यामुळे दडवला?

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते. याशिवाय समर्पित ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, आयोगाचे सदस्य एच. बी.पटेल, पंकज कुमार, महेश झगडे, नरेश गिते, शैलेशकुमार दरोकर आदी उपस्थित होते.

Nationalist Congress Party delegation
Video: निवडणूक आयोगाकडे आता डाटा मागितलाय; छगन भुजबळ

इम्पिरिकल डाटा वेळेत दिला गेला तर जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार होऊ शकतील. या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तसेच ओबीसी आरक्षणा बाबत चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.