कोरेगावात राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीचा पराभव केला...

कोरेगावातून Koregaon ज्यांना पक्षाने आतापर्यंत काही दिले नाही, अशांना संधी द्यावी, असे सांगून भगवानराव जाधव Bhagwanrao Jadhav व शिवाजीराव महाडिक Shivajirao Mahadik, असे दोन पर्याय मी अजितदादांपुढे Ajit pawar ठेवले होते.
Nitin patil
Nitin patilsarkarnama

कोरेगाव : कोरेगावातील विधानसभेच्या व जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पराभव समोरच्यांनी केला नाही, तर आपणच आपल्या हातांनी म्हणजे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. आता झालेल्या चुका दुरुस्त करून कोरेगावात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देऊ, कोणी कितीही पैसे घेऊन येऊ देत, कार्यकर्त्यांच्या ताकदीपुढे काही होऊ शकणार नाही. ज्यांना पलीकडे जायचे आहे, त्यांनी आजच जावे, अशांची गरज नाही, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे नितीन पाटील व संचालक रामभाऊ लेंभे यांचा सत्कार झाला. यावेळी शिवाजीराव महाडिक, कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, काकासाहेब गायकवाड, तानाजी मदने, संजय झंवर, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, प्रताप कुमुकले आदी उपस्थित होते.

Nitin patil
नितीन काका बँकेचे अध्यक्ष झाले..पण, कौतूक करायला तात्या नाहीत...

नितीन पाटील म्हणाले, ''जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी किसन वीर कारखान्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी प्राथमिक चर्चा झाली. कोरेगावातून गेल्या वेळी सुनील माने व त्याआधी लालासाहेब शिंदे यांना संधी दिली. आता ज्यांना पक्षाने आतापर्यंत काही दिले नाही, अशांना संधी द्यावी, असे सांगून भगवानराव जाधव व शिवाजीराव महाडिक, असे दोन पर्याय मी अजितदादांपुढे ठेवले होते. चर्चेअंती त्यांनी भगवानतात्या यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली होती. दरम्यान, दुर्दैवाने भगवानतात्या आपल्यामध्ये राहिले नाहित.

Nitin patil
कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध...

त्यानंतर श्री. महाडिक यांची उमेदवारी निश्चित झाली. या निवडणुकीत आपल्याकडे मतांची संख्या अधिक असतानाही श्री. महाडिक यांचा चिठ्ठीवर पराभव झाला. गेल्या चार-पाच वर्षांत या तालुक्याशी माझा संपर्क कमी झाल्याने पाच- सहा मते माझ्या हातातून गेली. राजकारणात पराभवदेखील होतो. त्यामुळे कोणी निराश होऊ नये. जय, पराजय दोन्ही पचवायचे असतात. आता आगामी काळातही निवडणुका आहेत. तुमच्या ताकदीपुढे काही होऊ शकणार नाही.''

Nitin patil
अजितदादांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड : सतीश काकडेंची माघार

या वेळी रामभाऊ लेंभे यांचेही भाषण झाले. आमदार शशिकांत शिंदे व नितीन पाटील यांनी समन्वयाचे व बेरजेचे राजकारण करावे, अशी अपेक्षा श्री. महाडिक, श्री. झंवर, सभापती जगदाळे, श्री. गायकवाड यांनी व्यक्त केली. भास्कर कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रताप कुमुकले यांनी आभार मानले.

Nitin patil
मकरंद पाटील यांच्या मतदारसंघाबाबत जयंत पाटलांची मोठी घोषणा

माजी उपाध्यक्षांवर निशाणा

'काकांनी आमचा बळी घेतला'वगैरे प्रकारचे बरेच आरोप या निवडणुकीत माझ्यावर झाले, असे नमूद करून श्री. पाटील म्हणाले, ''नितीन पाटलांनी ठरवले असते, तर ते सहा वर्षे उपाध्यक्ष राहिले असते का? यावेळी कोरेगावची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर 'त्यांना' बँकेत बसून 'पक्षनिष्ठा हेच आपले भांडवल आहे. कोणाला बळी पडू नका. भविष्यात तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. त्यावेळी मी व आमचे कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे राहू,' अशा शब्दांत समजून सांगितले होते; पण जे घडायचे ते घडून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com