सांगलीत राष्ट्रवादी अन् मनसेची आघाडी; भाजपचा केला दारूण पराभव

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्याकडून शरद पवारांवर सतत टीका केली जात आहे.
NCP-MNS alliance in Sangli Latest Marathi News
NCP-MNS alliance in Sangli Latest Marathi NewsSarkarnama

शिराळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे टीका केली जात आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील निनाईदेवी सेवा सहकारी सोसायटी मेणीच्या निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादीने आघाडी केल्याचे समोर आले आहे. (NCP-MNS alliance in Sangli Latest Marathi News)

निवडणुकीत आघाडीने भाजपच्या गटाचा पराभव करत सोसायटीतील सर्व तेरा जागा जिंकल्या आहेत. या आघाडीने सलग दुसऱ्यांदा सोसायटीत सत्ता काबीज केली आहे. निवडणुकीत आधीच दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर 11 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले.

NCP-MNS alliance in Sangli Latest Marathi News
बेळगावसह सीमाभागाबाबत आता शिवसेना देणार टक्कर; एकीकरण समितीबाबत राऊतांचं मोठं विधान

मनसे व राष्ट्रवादीने भाजपच्या आघाडीविरोधात आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली एकजुट केली होती. निवडणुकीत भाजपकडून पक्षाचे नेते सत्यजित देशमुख यांनी जोर लावला होता. पण त्यांच्या गटाचा पराभव झाला आहे.

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही माहिती देण्यात आली आहे. सोसायटीच्या निवडणुकीत चार दिवसांपूर्वीच पार पडली आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मेणी येथील श्री निनाईदेवी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीने विरोधकांचा सुपडा साफ करत १३/० असा दणदणीत विजय मिळवला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सर्व विजयी उमेदवारांचे, नवनियुक्त संचालकांचे अभिनंदन केले, असं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com