
-हेमंत पवार
Jayant Patil News : महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा NCP होणार हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस हा भविष्यकाळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणुन पुढे आणण्यात येईल, असे आश्वासक मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील jayant Patil यांनी येथे व्यक्त केले.
खासदार अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी महानाट्य पाहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कऱ्हाड (जि.सातारा) येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील हे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, अजित पवार ajit pawar, मी आणि आमच्या पक्षाचे सर्वच नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहोत.
खासदार कोल्हे हे आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकप्रतिनीधी म्हणुन लोकसभेत चांगले काम करत आहेत. माझ्या मुलाच्या सत्काराच्या कार्यक्रमात खासदार कोल्हे यांनी माझे, माझ्या मुलाचे कौतुक केले. त्यापलीकडे त्यांच्याही भावना वेगळ्या नव्हत्या. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढवणे ही आम्हा सर्वांची भूमिका आहे.
पक्ष वाढल्याशिवाय पुढची स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही. खासदार कोल्हे यांनी माझे कौतुक करताना माझ्याबद्दल उल्लेख केला. त्यांचे मी आभार मानेन. मात्र, येणाऱ्या २०२४ मध्ये राज्यात मोठा पक्ष म्हणुन पुढे आण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होणार हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे.
तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे, वाढत आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस हा भविष्यकाळात सर्वात मोठा पक्ष म्हणुन पुढे येईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, या वक्तव्याबाबत ते म्हणाले, इतर कोणत्याही पक्षापेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नवीन चेहऱ्यांना सतत संधी देण्याचे काम केले आहे. सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने नवीन चेहरे पुढे आणले आहेत. सर्वस्तरावर त्यांना हे काम करण्याची इच्छा दिसत आहे. ते आजपर्यंत नेहमीच असे करत आले आहे. त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केले असावे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.