Karad News : केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरातून राष्ट्रवादी टार्गेट : अनिल देशमुख यांचा आरोप

Karad News माजी गृहमंत्री देशमुख खाजगी दौऱ्यानिमित्त येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
NCP Leader Anil Deshmukh
NCP Leader Anil Deshmukhsarkarnama

-हेमंत पवार

Anil Deshmukh News : केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करुन राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असले कधीही गलिच्छ राजकारण नव्हते. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही तेथे खोटे आरोप करायला लावुन चौकशी सुरु करायची हा उद्योग देशात सुरु आहे. हा केवळ विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधीपक्ष पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. त्यावर काय प्रतिसाद मिळतोय त्याची वाट आम्ही पाहतोय, असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

माजी गृहमंत्री देशमुख Anil Deshmukh कराडला खाजगी दौऱ्यानिमित्त येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारणात विरोध राहतो मात्र एजन्सीचा गैरवापर करुन काही लोकांना चौकशीसाठी बोलवायचे, तुरुगांत टाकायचे असे प्रकार सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस NCP पक्षाला टार्गेट करण्यात येत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

माझ्यावर तर शंभर कोटींच्या गैरव्यवहारचा आरोप करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष आरोप पत्र दाखल केले तेव्हा त्यात एक कोटी 72 लाखच नमूद करण्यात आले. मला खोट्या आरोपात अडकवण्यात आले. माझा छळ करण्यात आला. न्यायालयाने माझ्यावर आरोप करण्यात आले ते ऐकीव माहितीच्या आधारे करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवले. खोटे आरोप करायला लावुन चौकशी सुरु करायला लावायचा उद्योग राज्यात सुरु आहे.

NCP Leader Anil Deshmukh
Satara News : नवउद्योजकांना ५५० कोटींचे अनुदान; युवकांनी रोजगार देणारे बनावे : उदय सामंत

संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. मध्यंतरी हजन मुश्रीफ यांच्या मागे लागले. आता जयंत पाटील यांना त्रास सुरू केला आहे. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधीपक्ष पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. त्यावर काय प्रतिसाद मिळतोय त्याची वाट आम्ही पाहतोय.

NCP Leader Anil Deshmukh
Radhakrushna Vikhe Vs Balasaheb Thorat; गणेशची धुरा कोणाकडे? | Ajit Pawar | NCP | BJP | Congress

आता आम्ही मोठे भाऊ

राष्ट्रवादी कॉंग्रेसच मोठा पक्ष आहे या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दाव्यावर ते म्हणाले, काही दिवसापूर्वी काँग्रेसचे आमदार जास्त होते. त्यावेळेला ते आमचे मोठे भाऊ होते. आता राष्ट्रवादीचे आमदार, खासदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे आता आम्ही मोठे भाऊ आहोत. मात्र विधानसभा, लोकसभा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येवुनच लढवणार आहोत. निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.

नोटाबंदीबाबत ते म्हणाले, नोटाबंदीने सर्व समाजाला त्रास झाला. दोन हजाराची नोटबंदी का झाली याला थातुरमातुर उत्तर दिले जात आहे. कोणत्या अर्थ तज्ञाला विचारून नोट बंदी केली ही माहिती आता पुढे येईल.

NCP Leader Anil Deshmukh
NCP Vs Congress : '' आघाडीत राष्ट्रवादीच मोठा पक्ष...''; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची अजितदादांच्या विधानाला सहमती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com