Nashik Graduate Election : नाशिकमध्ये गिरीश महाजनांचा 'करेक्ट कार्यक्रम' : भाजपचा 'एबी फॉर्म' कोणालाच नाही.

Nashik Graduate Election : भाजपतर्फे ही ठरवून करण्यात आलेली खेळी असल्याची चर्चा!
Nashik Graduate Election : Girish Mahajan : Satyajeet Tambe
Nashik Graduate Election : Girish Mahajan : Satyajeet TambeSarkarnama

Nashik Graduate Constituncsy Election : नाशिक पदवीधर मतदार संघात मोठा ट्विस्ट आला आहे. कॉंग्रेसचा एबी फॉर्म मिळूनही उमेदवाराने अपक्ष अर्ज दाखल केला आहे, तर भाजपने एबी फॉर्मच दिलेला नाही. पक्षातर्फे या मतदार संघाचे जबाबदारी असलेले, संकटमोचक असलेले राज्याचे मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी कोणती खेळी खेळली आहे. याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांनी विजयाची हॅटट्रीक केली होती, त्यामुळे पक्षातर्फे त्यांची उमेदवारी निश्‍चित होती. भाजपतर्फे मात्र उमेदवाराचा शोध सुरू होता. मात्र भाजपने डाव टाकत कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला. दुसरीकडे कॉंग्रेसतर्फे पक्षाने डॉ.सुधीर तांबे यांची उमेदवारी निश्‍चीत केली, त्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवार अर्ज भरणार हे निश्‍चीत झाले त्यामुळे भाजपतर्फे कोण?याची चर्चा सुरू होती.

Nashik Graduate Election : Girish Mahajan : Satyajeet Tambe
Graduate Constituency Election : पक्षाने सांगितलं तर सत्यजीत तांबेंना पाठिंबा देऊ : विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

अर्ज भरण्याच्या वेळी वेगळाच ‘खेळ’झाला. अर्ज दाखल करताना कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता सत्यजीत तांबे यांनी अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, त्यांच्या नावाचा कॉंगेसचा एबी फॉर्म नव्हता. त्यामुळे ते अपक्ष उमेदवार आहेत.

काँग्रेसचा एबी फॉर्म दाखल न करता सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार अर्ज दाखल झाला तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षातर्फे सुध्दा कोणालाच एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीत या मतदार संघात कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही, आता सर्व उमेदवार अपक्ष आहेत. भाजपतर्फे ही ठरवून करण्यात आलेली खेळी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मतदार संघाची जबाबदारी भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारांने एबी फॉर्म दाखल न करणे, सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करणे आणि दुसरीकडे भाजपनेही आपला एबी फॉर्म न देणे यामागे भाजपचे महाजन यांनी कोणती खेळी केली आहे, हे आगामी काही दिवसात दिसून येत आहे.

Nashik Graduate Election : Girish Mahajan : Satyajeet Tambe
Graduate Constituency Election : नाशिकमधील चित्र स्पष्ट होतेय, सत्यजित तांबेच्या उमेदवारीवर बावनकुळे स्पष्टच बोलले..

या मतदार संघात डॉ.राजेंद्र विखे पाटील हे भाजपतर्फे उमेदवार मानले जात होते, मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे कॉंग्रेसच्या डॉ.सुधीर तांबे यांच्या विरूध्द सक्षम उमेदवार नसल्याने भाजपने कॉंग्रेसच्याच उमेदवाराला गळाला लावले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपच्या पुढील खेळीकडे लक्ष असणार आहे. भाजपला या मतदार संघात उमेदवारीचे संकट होते, संकटमोचक महाजनांनी सद्या तरी हे संकट दूर केले असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in