Satyajit Tambe News : एका विधान परिषदेसाठी भाजपवर नामुष्की; मोदींच्या फोटोला काळे फासलेल्या तांबेंना पाठिंबा?

Satyajit Tambe News : नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये मोठे राजकीय नाट्य घडले आहे.
Satyajit Tambe News
Satyajit Tambe NewsSarkarnama

Satyajit Tambe News : नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये मोठे राजकीय नाट्य घडले आहे. काँग्रेस, भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही अधिकृत उमेदवार नाही. काँग्रेसने (Congress) विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांच्या जागी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. तर भाजपने कोणालाच उमेदवारी दिली नाही, तसेच अपक्ष उमेदवारांनाही माघार घ्यायला लावली आहे.

त्या प्रमाणे भाजपचे (BJP) धनंजय जाधव, धनराज विसपुते यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. भाजपचे नेते मंत्री गिरीष महाजन यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासंदर्भात सूचक विधान केले आहे. आता भाजपा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. सत्यजीत यांनी अपक्ष अर्ज भरला यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी असल्याची चर्चा आहे. मात्र, एका विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपचा इतका आटापीटा का आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Satyajit Tambe News
Satyajit Tambe News : वडिलांची आमदारकी हिसकावली; पक्षाशी बंडखोरी : आमदारकीसाठी सत्यजीत तांबेंचे गुडघ्याला बाशिंग

अपक्ष उमेदवारला पाठिंबा देण्याची वेळ भाजपवर आली आहे. तसेच ज्या सत्यजीत तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटाला जाहीरपणे काळे फासले होते, त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजप उतावीळ झाली आहे. एका विधान परिषदेच्या जागेपुढे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा काहीच महत्वाची नाही का? असा सवला भाजपचे कार्यकर्तेच विचारत आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि चेहऱ्यावर भाजप देशात नंबरएकचा पक्ष बनला आहे. केंद्रातील सत्तेपासून ते महापालिकेपर्यंत भाजप सत्तेत आला आहे. मात्र, त्याच पंतप्रधानांच्या फोटोला काळे फासणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची रणनिती भाजप आखत आहे.

Satyajit Tambe News
Satyajeet Tambe News : सत्यजित तांबेंनी काँग्रेसशी असलेले नाते तोडले : सोशल मीडियावरील डीपी बदलला, पदांचा उल्लेख हटवला

अनेक वर्ष विविध पदे देऊनही तांबे काँग्रेसचे झाले नाहीत, मग अपक्ष असताना आणि भाजपच्या सरोच्च नेत्यांवर सडकून टीका करणारे तांबे भाजपचे होतील का? असा सवाल भाजपचेच कार्यकर्ते खाजगीत करत आहेत. या मतदार संघात तांबे यांचे वजन आहे. त्यांचा जनसंपर्क आणि मतदार नोंदणीत घेतलेली आघाडी यामुळे त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे भाजप त्यांच्यासाठी पाघड्या घालत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com