डॉ. नरेंद्र घुले यांनी मुळा उजवा कालवा दुरुस्तीसाठी मागितला दहा कोटींचा निधी

महाराष्ट्राचे ( Maharashtra ) जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक झाली.
Narendra Ghule
Narendra GhuleSarkarnama

नेवासे ( अहमदनगर ) : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली आज (ता. २९) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यात जलसंपदा विभाग राबवित असलेल्या निळवंडेसह सहा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

नेवासे तालुक्यात असणार कौठा या गावात मुळा मुख्य कालवा नेहमीच फुटत असतो त्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी होते याबाबत तोडगा काढण्यासाठी सद्यप्रश्नांकडे माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी मंत्री जयंत पाटील आणि उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, शेवगावचे सभापती डॉ. क्षितिज घुले, काकासाहेब नरवडे, जलसंपदाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य अभियंता डॉ.संजय बेलसरे, विशेष प्रकल्प, पुण्याचे मुख्य अभियंता एस. टी. धुमाळ, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक अ. रा. नाईक आदी उपस्थित होते.

Narendra Ghule
नद्याजोड प्रकल्पात राजकारण नकोच : नरेंद्र घुले

त्यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली शेवगाव, पाथर्डी व नेवासे तालुक्यातील शेतककऱ्यांचे शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची भेट घेऊन मुळा उजवा कालवा वितरका नूतनीकरण करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली.

शेवगाव, पाथर्डी व नेवासे तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी मुळा उजवा कालव्यावरील ब्रँच-2, टेल डीवाय व पाथर्डी ब्रँच नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

Narendra Ghule
"ज्ञानेश्वर'च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नरेंद्र घुले

घुले पाटील म्हणाले, जायकवाडी धरण होतांना धरणासाठी जमिनी गेल्या त्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना आणि पूर्वसन करण्यासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना मुळा धरणाचे बारामाही पाणी देण्याचे सरकारने आश्वासित केले होते. मात्र प्रत्यक्षात कोणालाच पाणी मिळत नाही.मागील वर्षी मुळा धरण शंभर टक्के भरून सुद्धा टेलच्या भागात पाणी पोहचले नाही. त्यामुळे शेवगाव, पाथर्डी व नेवासे तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे.

यासाठी मुळा उजवा कालव्यावरील तीस गावांना लाभ मिळणारी ब्रँच-2 चे नूतनीकरणासाठी चार कोटी 89 लाख, 25 गावांना लाभ मिळणारी टेल डीवायच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी 60 लाख रुपये व 36 गावांना लाभ मिळणारी पाथर्डी ब्रँचच्या नूतनीकरणासाठी 3 कोटी 36 लाख असा 9 कोटी 87 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी केली.

मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी माजी नरेंद्र घुले पाटील यांचे मुद्दे गांभीर्याने घेत या प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्याच्या संबंधितांना सूचना देत. या कामासाठी तातडीने निधी देण्याचे ही आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com