नारायण राणे म्हणाले, आमदार जगताप लवकरच पुन्हा सक्रिय होतील

भाजप आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) हे गेले महिनाभर रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama

पिंपरी - चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) हे गेले महिनाभर बाणेर येथील ज्युपीटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून अनेक मान्यवर त्यांची विचारपूस करीत आहेत. ( Narayan Rane said, MLA Jagtap will be active again soon )

केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी रुग्णालयात येऊन आमदार जगतापांच्या प्रकृतीची आज (ता. 15) विचारपूस केली. हा लोकनेता लवकरच सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला.

Narayan Rane
नारायण राणे पुन्हा रडारवर; बांधकामासंदर्भात १५ दिवसांचा अल्टिमेटम

लवकर बरे व्हा, असे राणे या भेटीत आमदार जगताप यांना म्हणाले. आमदार जगताप हे लोकनेते आहेत. त्यामुळे ते लोकांपासून फार काळ दूर राहू शकणार नाहीत. लवकरच ते सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर आणि उद्योजक विजय जगतापांकडून उपचाराबाबत अधिक माहिती घेतली.

Narayan Rane
Video: नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा - नितेश राणे

आमदार जगताप यांचे राजकारणात प्रत्येकांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यातून आतापर्यंत अनेक दिग्गजांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार व माजी मंत्री डॉ. गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक आजी, माजी मंत्र्यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com