अब्दुल कलामांचा अवमान करणाऱ्या नरसिंहानंद सरस्वतीवर अखेर नगरमध्ये गुन्हा दाखल

उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अवमान करणारे वक्तव्य केले होते.
Yati Narsinhanand Saraswati
Yati Narsinhanand SaraswatiSarkarnama

अहमदनगर - उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अवमान करणारे वक्तव्य केले होते. नरसिंहानंद सरस्वतीच्याविरोधात कार्यवाही करण्याचे आदेश अहमदनगरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश टी. एम. निराळे यांनी तोफखाना पोलिसांना दिले होते. त्यानुसार आज तोफखाना पोलिस ठाण्यात जातीय द्वेश पसरविणे या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Narasimhanand Saraswati was finally booked in Ahmednagar for insulting Abdul Kalam )

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बहिरनाथ वाकळे, आर्किटेक्‍ट अर्शद शेख, कामगार नेते अनंत लोखंडे न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. ऍड. असिम सरोदे यांनी न्यायालयामध्ये तक्रारदारांतर्फे बाजू मांडली. यती नरसिंहानंद सरस्वती याने फेब्रुवारी 2021 मध्ये अलिगढ (उत्तर प्रदेश) येथे आयोजित मेळाव्यात देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. देशाच्या एकात्मतेस व मानवतेस धोका निर्माण करणारी जातीयवादी विधाने केली होती.

Yati Narsinhanand Saraswati
अब्दुल कलामांना नावे ठेवणाऱ्या नरसिंहानंद यांच्याविरुद्ध FIR चा आदेश

यु-ट्युबवर हा व्हिडीओ पहिल्यानंतर अहमदनगरच्या जागरूक नागरिक बहिरनाथ वाकळे, आर्किटेक्‍ट अर्शद शेख, अनंत लोखंडे यांनी यती नरसिंहनंद सरस्वती याच्या विरोधात तक्रार दाखल केली. अहमदनगर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे अहमदनगर येथील न्यायालयात जुलै 2021 मध्ये खासगी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.

ज्येष्ठ विधिज्ञ सरोदे यांना अॅड. मदन कुऱ्हे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई, अॅड. तृणाल टोणपे, अॅड. सुनयना मुंडे, अॅड. फारुख बिलाल शेख, अॅड. इरफान शेख व अॅड. साकिब शेख यांनी सहकार्य केले. न्यायालयाने तोफखाना पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज तोफखाना पोलिस ठाण्यात पोलिसांनी जाती द्वेश पसरविल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Yati Narsinhanand Saraswati
चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावर संग्राम जगताप काय भूमिका घेणार?

अब्दुल कलाम हे माजी राष्ट्रपती व देशाचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांची पेन्शनही सामाजिक कार्यासाठी वापरली होती. त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य आहे. कलामां विरोधात नरसिंहानंद सरस्वती याचे वक्तव्य चुकीचे होते. भारतात संविधानाचे राज्य आहे. धार्मिक विद्वेशाला देशात कुठेही जागा नसावी. धार्मिक विद्वेश पसरविणाऱ्या प्रवृत्तींना न्यायालयाने आळा बसविला आहे. नरसिंहानंद सरस्वतींसारख्या प्रवृत्तींमुळे भारताच्या एकात्मता व अखंडतेला धोका निर्माण होतो.

- अनंत लोखंडे, कामगार नेते.

भारतात अब्दुल कलामांसारख्या महापुरूषांची पुस्तके वाचून विद्यार्थांतील तरूण पिढी घडत आहे. या तरुण पिढी समोरील देशातील आदर्श नष्ट करणारी व्यवस्था तयार होऊ पाहत आहे. अशा प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी आम्ही ही फिर्याद दिली होती. न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य होता. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

- बहिरनाथ वाकळे, माजी विरोधी पक्षनेते, अहमदनगर महापालिका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com