बंडखोर घार्गेंचा अजित पवारांना धक्का; नंदकुमार मोरे यांचा पराभव

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत.
बंडखोर घार्गेंचा अजित पवारांना धक्का; नंदकुमार मोरे यांचा पराभव
Prabhakar Gharge, Ajit PawarRushikesh Pawar

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खटाव सोसायटी मतदारसंघात पक्षाला क्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खटावमध्ये येऊन जिल्हा बॅंकेसाठी नंदकुमार मोरे (Nandakumar More) यांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्याविरोधात उभे राहत माजी आमदार प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) यांनी पवारांनाच आव्हान दिले होते. या निवडणुकीत घार्गे यांचा दहा मतांनी विजय मिळाल्याने थेट अजित पवारांनाच धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार नंदकुमार मोरे यांच्याविरोधात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने या लढतीला महत्त्‍व आले होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी सोसायटी मतदारसंघावर कायम वरचष्मा ठेवणाऱ्या घार्गे यांची बंडखोरी राष्ट्रवादीला त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र आधीपासूनच दिसत होते.

Prabhakar Gharge, Ajit Pawar
सातारा जिल्हा बँक निवडणूकीत शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का

या निवडणुकीत घार्गे यांना 56 तर मोरे यांना 46 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीने आणि खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमध्ये येऊन जिल्हा बॅंकेसाठी नंदकुमार मोरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. तर सलग १५ वर्षांहून अधिक काळ या मतदारसंघाचे नेतृत्व प्रभाकर घार्गे यांनी केले आहे. त्यामुळे एका बाजूला सत्ताधारी पक्षाची ताकद व दुसऱ्या बाजूला मतदारांशी घरोब्याचे संबंध अशी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांत सरळ लढत होती. दोन्हीही उमेदवार तुल्यबळ असल्याने या मतदारसंघात मतांची विभागणी कशी होणार, कोण कोणासमवेत जाणार, एखादे नवीन राजकीय समीकरण जुळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून लागले होते.

Prabhakar Gharge, Ajit Pawar
पाटणकर ठरले 'जायंट किलर'; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

या निवडणुकीत घार्गे यांनी बाजी मारली आहे. खटाव सोसायटी मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात प्रभाकर घार्गे यांचा दांडगा संपर्क असून, छोटा का होईना परंतु, राजकीय गट अस्तित्वात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत घार्गे गटाची ही बहुमूल्य मते विरोधात गेली. तर प्रचंड डोकेदुखी वाढणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते चिंतेत आहेत. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील संभाव्य धोका लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घार्गे यांना छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आता रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in