वाळूचे तीन टिप्पर चालवण्यासाठी २१ हजारांची लाच स्वीकारताना पोलिसाला पकडले

शिवाजी पाटील असं लाच स्विकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं तर मारुती कवळे खाजगी व्यक्तीचं नाव आहे.
वाळूचे तीन टिप्पर चालवण्यासाठी २१ हजारांची लाच स्वीकारताना पोलिसाला पकडले
shivaji patilsarkarnama

नांदेड : लातूरमध्ये विस्तार अधिकाऱ्याला 5 हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने काही दिवसापूर्वी रंगेहाथ पकडले होते. आता नांदेडमध्येही (Nanded) लाचलुचपत पथकाने एका पोलीस कर्मचाऱ्याला 21 हजारांची लाच घेताना पकडलं आहे. काही दिवसांपासून लाचलुचपत पथकाने (LCB) लाच घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे.(Nanded Latest Crime News)

वाळूचे तीन टिप्पर चालवण्यासाठी 21 हजाराची लाच स्विकारताना पोलिस कर्मचाऱ्यांसह एका खाजगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. शिवाजी पाटील असं लाच स्विकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं तर मारुती कवळे खाजगी व्यक्तीचं नाव आहे.

shivaji patil
Rajya sabha Election : मतदानासाठी आमदारांना या नियमाचं पालन करावं लागतं..

ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील याने वाळूचे तीन टिप्पर चालविण्यासाठी दर महा 21 हजाराची मागणी केली होती. त्यावरुन ओंकारेश्वर नगर जवळ शिवाजी पाटील आणि मारोती कवळे यांनी 14 हजार रुपये रोख रक्कम आणि फोन पे वर सात हजाराची लाच स्वीकारली.

shivaji patil
अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला पुन्हा डिवचलं ; नेटकऱ्यांकडून हटके उत्तर

लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यावेळी तपासणीत शिवाजी पाटील याच्या खिशात अडीच लाख रुपये देखील सापडले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील आणि मारूती कवळे विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी पाटील याने वरिष्ठांच्या सागण्यावरुन तर लाच स्विकारली का याचा तपास आता लाच लूचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in