नागवडेंनी कारखाना मोठ्या फरकाने राखला : पाचपुतेंचा धुव्वा

या निवडणुकीत राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) व बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या समर्थकांत थेट लढत होती.
नागवडेंनी कारखाना मोठ्या फरकाने राखला : पाचपुतेंचा धुव्वा
Rajendra NagawadeSarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या समर्थकांत थेट लढत होती. काल ( शुक्रवारी ) मतदान प्रक्रिया झाली. आज मतमोजणी रात्री उशीरापर्यंत झाली. नागवडे यांचे किसान क्रांती मंडळ आघाडीने विरोधकांना क्लिन स्विप करत निर्विवाद वर्चस्व मिळविले. आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्व विरोध मोडित काढत राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. Nagwade maintained the factory by a big margin: defeat of Pachpute

पॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया झाल्याने मतमोजणीसाठी वेळ लागत आहे. शिवाजीराव नागवडे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेंद्र नागवडे गटाने सर्व जागा जिंकल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सर्व 21 जागांचे निकाल हाती आले असून सर्व जागा नागवडे गटाने मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. दरम्यान, विरोधी मंडळाचे प्रमुख केशव मगर, अण्णासाहेब शेलार, प्रतिभा बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला.

Rajendra Nagawade
नागवडे कारखान्यात राजेंद्र नागवडेंच्या पॅनेलची सरशी

नागवडे कारखान्याच्या 21 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. आज सकाळी शहरातील शासकीय गोदामात मतमोजणीस प्रारंभ झाला. रात्री उशिरा निकाल हाती आला. यात सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील मतांचे अंतर अडीच हजारहून अधिक आहे. सत्ताधारी मंडळाचे प्रमुख राजेंद्र नागवडे दोन मतदारसंघातून जिंकले. तर मंडळाचे प्रमुख केशवराव मगर व अण्णासाहेब शेलार, प्रतिभा पाचपुते, भगवानराव पाचपुते यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. जाहीर निकालानुसार उर्वरित निकालही नागवडे गटाच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

सेवा संस्था मतदारसंघात 41 पैकी 25 मते मिळवत राजेंद्र नागवडे यांनी बाळासाहेब नाहाटा यांचा नऊ मतांनी पराभव केला. नागवडे या मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवतील अशी अपेक्षा होती. मात्र नाहाटा यांनी 16 मते मिळवत जोरदार लढत दिली.

Rajendra Nagawade
नागवडे पाचपुतेंना म्हणाले, 'तुम्ही' आमच्यामुळेच आमदार...

शनिवारी रात्रीपर्यंत हाती आलेले निकाल असे -

बेलवंडी गट - विजयी - दत्तात्रय काकडे - 9973, लक्ष्मण रायकर - 9970, भीमराव लबडे - 9437. पराभूत - विकास काकडे - 6407, तुळशीराम रायकर - 6486, अण्णासाहेब शेलार - 6872.

टाकळी कडेवळीत गट - विजयी - भाऊसाहेब नेटके - 9860, प्रशांत दरेकर - 9959, सुरेश रसाळ - 9723. पराभूत - लक्ष्मण रसाळ - 6536, हरिशचंद्र गव्हाणे - 6583, रोहिदास पवार - 6603.

श्रीगोंदे गट -विजयी - सुभाष शिंदे - 9970, बाबासाहेब भोस - 9874 पराभूत - जिजाबापू शिंदे - 6888, बापूसाहेब भोस - 6349.

लिंपणगाव गट - विजयी - विठ्ठल जंगले - 9548, विश्वनाथ गिरमकर - 9892, प्रशांत शिपलकर - 9314. पराभूत - केशव मगर - 7480, शांताराम भोईटे - 6481, हरिभाऊ कुरुमकर - 6494.

काष्टी गट - विजयी - राजेंद्र नागवडे- 10563, राकेश पाचपुते 9683 पराभूत - भगवानराव पाचपुते - 6630, वैभव पाचपुते - 5981.

कोळगाव गट - विजयी - श्रीनिवास घाडगे - 8808, शरद जगताप - 9777 पराभूत - महादेव फराटे - 6678, देवीदास थिटे - 6642

सोसायटी मतदार संघ विजयी- राजेंद्र नागवडे - 25 पराभूत- बाळासाहेब नाहाटा - 16

महिला राखीव विजयी- मेघा औटी- 9688 विजयी- मंदाकिनी पाचपुते 9307 पराभूत- सुरेखा काळाणे 6559 पराभूत- प्रतिभा पाचपुते 7537

बंडू जगताप, बरकडे, सावता हिरवे हेही विजयी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in