नगर व सोलापूरची विधान परिषद निवडणूक यामुळे ढकलली पुढे...

महाराष्ट्रातील ( Maharashtra ) आठ विधान परिषद ( Legislative Council ) आमदारांचा कार्यकाळ डिसेंबर अखेरपर्यंत संपत आहे.
Vidhan Parishad
Vidhan ParishadSarkarnama

अहमदनगर : महाराष्ट्रातील आठ विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ डिसेंबर अखेरपर्यंत संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही निवडणूक आठ विधान परिषद मतदार संघात न होता केवळ सहाच विधान परिषद मतदार संघातून होणार आहे. यात अहमदनगर व सोलापूर हे दोन मतदार संघ वगळण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व इच्छुकांना निवडणुकीच्या तयारीला आणखी कालावधी मिळणार आहे. Nagar and Solapur Legislative Council elections postponed due to this ...

राज्यातील आठ विधान परिषद मतदार संघाची मुदत संपत आहेत. यात मुंबईतील आमदार रामदास कदम व अशोक जगताप, कोल्हापूरमधील सतेज पाटील, धुळे-नंदूरबारमधील अमरिशभाई पटेल, अकोले-बुलडाणा-वाशिममधील गोपीकिसन बजोरिया, नागपूरमधील गिरीशचंद्र व्यास, सोलापूरमधील प्रशांत परिचारक व अहमदनगरमधील अरूण जगताप या आमदारांचा कार्यकाळ डिसेंबर अखेर संपत आहे.

Vidhan Parishad
राजकीय गणिताची जुळवाजुळव झाल्यावर होणार विधान परिषद निवडणूक ?

ही बाब लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हा प्रशासनाला मतदारांची माहिती मागील महिन्यात मागविली होती. ही माहितीचा अहवाल संबंधित जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आज हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

कोरोना कालावधीत अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा कार्यकाळ संपूनही राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेतलेली नाही. तेथे सध्या प्रशासक नियुक्त आहेत. अशा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांना विधान परिषदेसाठी मतदान करता येणार नाही. निवडणुकीच्या नियमांनुसार 75 अथवा त्या पेक्षाही जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येत असेल तरच त्या मतदार संघात निवडणूक होते. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मतदारांना कार्यकाळ संपल्यामुळे मतदान करता येणार नाही. त्यांच्या जागांवरील निवडणूकही झालेली नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यातील विधान परिषदेच्या जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

Vidhan Parishad
कर्डिलेंनी विखेंना भरविली मिठाई

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाल्यावरच तेथे विधान परिषद निवडणूक होणार आहे. यातच अहमदनगर जिल्हा परिषद सदस्यांनी मुदत मार्च 2022 अखेर संपत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात या दोन मतदार संघांच्या निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे. तर डिसेंबर 2021 अखेरपर्यंत आणखी काही स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपत असल्याने मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डिसेंबर महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे.

Vidhan Parishad
विधान परिषदेसाठी बिगूल : मतदारयादीचे निकष जाहीर; मुदत संपलेले नगरसेवक हळहळले

सहा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम

विधान परिषदेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला. तेथे 10 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत मतदान होईल तर 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 23 व 24 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया होईल. 26 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com