चंदगडशी माझे जुने नातेसंबंध : सतेज पाटलांचे भावनिक आवाहन

मनसे कार्यालयात नगरसेवक दौलतराव पाटील, अमर गजरे, अपक्ष संदीप वाईंगडे व सपना नलवडे यांची पाटील यांनी भेट घेऊन बंद दरवाजाआड गुफ्तगू केले.
चंदगडशी माझे जुने नातेसंबंध : सतेज पाटलांचे भावनिक आवाहन
Satej PatilSarkarnama

पन्हाळा : विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांशी संपर्क साधला. पन्हाळा नगरपालिकेतील असिफ मोकाशी गटाच्या नगरसेवकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. पन्हाळा विकास आघाडीच्या नगरसेविका विना बांदिवडेकर यांनीही पाटील यांना मदत करण्याची ग्वाही दिली. आजरा, चंदगड तसेच हुपरी येथील मतदारांशी संपर्क साधला. चंदगड तालुक्याशी माझे जुने नातेसंबंध आहेत. पालकमंत्री म्हणून तालुका आणि चंदगड शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी दिला आहे. यापुढेही ही आपुलकी कायम राहील, असे भावनिक आवाहनही पाटील यांनी केले. (My old relationship with Chandgad : Satej Patil's emotional appeal)

शाहू महाआघाडीच्या मोकाशी गटाचे असिफ मोकाशी, संध्या पोवार, मिनाज गारदी यांनी सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली. माजी नगराध्यक्ष जितेंद्र पोवार, मिलिंद बांदिवडेकर, ईलाई गारदी, माजी नगरसेवक सतीश भोसले उपस्थित होते. चंदगड येथील बैठकीला चौदा नगरसेवक, तीन जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती असे २५ पैकी १८ मतदार उपस्थित होते. आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.

Satej Patil
राष्ट्रवादीचा काँग्रेस-शिवसेनेला एकाच वेळी दे धक्का!

विधान परिषद निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी हुपरी येथे बोलताना व्यक्त केला. शहर काँग्रेस कार्यालयात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट, भाजपचे नगरसेवक भरत लठ्ठे, भाजपचे युवा नेते अमित गाट, रिपब्लिकनचे मंगलराव माळगे, नगरसेवक जयकुमार माळगे, ताराराणी आघाडीचे पक्ष प्रतोद सूरज बेडगे आदींची भेट घेतली. मनसे कार्यालयात नगरसेवक दौलतराव पाटील, अमर गजरे, अपक्ष संदीप वाईंगडे व सपना नलवडे यांची पाटील यांनी भेट घेऊन बंद दरवाजाआड गुफ्तगू केले. मानसिंगराव देसाई, बाळासाहेब जाधव, लालासाहेब देसाई, राजेश होगाडे, बाहुबली गाट, बाबासाहेब गायकवाड, किरण पोतदार, प्रतापसिंह जाधव आदी उपस्थित होते.

Satej Patil
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री म्हणतात, मी फडणवीसांच्या ऋणात राहू इच्छितो!

आजरा येथे सत्ताधारी व महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची सतेज पाटील यांनी भेट घेतली. मतदान करून सहकार्य करण्याची विनंती केली. सत्ताधारी व महाविकास आघाडीच्या नेतमंडळींशी मतदानाच्या जोडणीबाबत खलबते केली. सत्ताधारी भाजपप्रणित ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते. अशोक चराटी यांनी स्वागत केले. आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह नलवडे, आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, जि. प. सदस्य उमेश आपटे, विद्याधर गुरबे प्रमुख उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in