
Uttamrao Jankar on Vijaysinh Mohite-Patil: माझा लढा मोहिते-पाटीलांविरोधात नव्हे तर त्यांच्यातील प्रवृत्तीविरोधात आहे. त्यांच्या विरोधातील ही लढाई माझ्या जीवात जीव आहे, माझ्याकडे शक्ती आहे तोपयर्यंत सुरूच राहील, असा निर्धार अकलूज (Akluj) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीतील मोहिते-पाटील विरोधी गटाचे एकमेव विजयी उमेदवार उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे.
जानकर हे माहिते-पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जातात. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ते सातत्याने मोहिते-पाटील यांना आव्हान देत आहेत. बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलने (Mohite Patil) अपेक्षप्रमाणे बाजी मारली आहे. मात्र, तालुक्याच्या राजकारणाच्या इतिहासात बाजार समितीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांच्या रुपाने विरोधकाचा प्रवेश झाला आहे. विरोधी पॅनलमधील ते एकमेव निवडून आले आहेत.(Solapur Politics)
‘सरकारनामा’शी बोलताना जानकर म्हणाले, ‘‘ गेल्या तीस वर्षात चाळीस वेळा पराभूत झालेला मी कार्यकर्ता आहे. निवडणूक ही परिवर्तनासाठी त्यासाठी लढाई व्हावी, लोकांना स्वातंत्र मिळावं त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी मी या निवडणुका लढवत आहे. यपापुढच्या काळातदेखील आपला लडा असाच सुरू राहील.’’ (Maharashtra Politics)
तीस वर्षात चाळीस निवडणुका लढल्या, पण येत्या निवडणुकीत उत्तम जानकर पुन्हा एकदा भाजपमध्ये जातील ही चर्चा आहे, या प्रश्नावर जानकर म्हणाले, ‘‘ निवडणुकीत जर तर ला अर्थ नसतो. ज्या-त्या वेळी निर्णय़ घ्यायचा असतो. मोहिते-पाटील राष्ट्रवादीतदेखील जाऊ शकतात. वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. पण मी एकच सांगतो कोणताही पक्ष किंवा पार्टी माझा शत्रू नाही. मात्र, मोहिते-पाटील (Mohite-Patil) यांच्यातील प्रवृत्ती ही माझी शत्रू आहे.त्यांच्यातील ही प्रवृत्ती गाडण्यासाठी जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मी लढत राहणार, मी हार-जीत, जयपराजयाची पर्वा करत नाही.’’
तुमचा विजय तुम्हाला विधानसभेत घेऊन जाण्यासाठी विधानसभा मतदारसंघात तशी पोषक परिस्थिती आहे का? या प्रश्नावर जानकर म्हणाले, ‘‘ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत डिपॉझिट गेलेले लोकही आमदार होतात. त्या अर्थाने माझा हा विजय खूपच दैदिप्यमान विजय आहे.असे काही ठराविक लोक असतात, ज्यांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रस्थापितांना किंवा सत्ताधाऱ्यांना पटकन कवेत घेता येते. पण जेव्हा सामान्य जनता मैदानात असते. शेवटचा माणूस मैदानात असतो, तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं प्रस्थापितांना शक्य नसतं. त्यामुळे मला पुर्णपणे खात्री आहे हा विजय येणाऱ्या निवडणुकांसाठी लोकांचा उत्साह वाढवणारा आहे.विधानसभेत जाण्याचा माझा मार्ग मोकळा करणारा कालचा निकाल आहे.’’
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.