मुश्रीफांच्या कोल्हापुरात विखे सक्रिय : कोल्हापूरकरांच्या प्रश्नावर मुंबईत घेणार बैठक

राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी मंत्री झाल्यावर पहिलाच मोठा प्रशासकीय दौरा हसन मुश्रीफांच्या कोल्हापूर जिल्ह्यात काढला.
Radhakrishna Vikhe Patil in Kolhapur
Radhakrishna Vikhe Patil in KolhapurSarkarnama

Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीच्या काळात हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र राज्यातील सत्ता परिवर्तन होताच राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) हे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागांचे मंत्री झाले. त्यांनी मंत्री झाल्यावर पहिलाच मोठा प्रशासकीय दौरा हसन मुश्रीफांच्या कोल्हापूर जिल्ह्यात काढला. यावेळी त्यांच्या बरोबर भाजपच्या नेत्यांबरोबर शिवसेनेचे बंडखोर खासदारही होते.

शासकीय विश्रामगृह येथे आज महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरीक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अमित माळी, बाबासाहेब वाघमोडे, अश्विनी जिरंगे, तहसीलदार शीतल मुळे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil in Kolhapur
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, खंडणी वसुलीत आघाडी सरकार पटाईत

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलं‍बित प्रश्न आणि मागण्या आज आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतल्या आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुंबईत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या प्रलंबित मागण्याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजचे असल्याचे सांगून विखे पाटील म्हणाले, शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मान्यता तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल. तुकडा बंदी, वाढीव गायरान, विमान तळ यासह अन्य विकास कामाना चालना देता यावी यासाठी प्रशासनास आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. प्रशासनाने मांडलेले प्रश्न आणि नागरीकांच्या समस्या या संदर्भात कृती आरखाडा तयार करुन त्यानुसार त्याच्यावर कार्यवाही करुन असे ते म्हणाले. वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असून या संदर्भात काही अडचणी येत असतील तर त्या सोडविल्या जातील.

Radhakrishna Vikhe Patil in Kolhapur
डॉ. सुजय विखे पाटलांना वडिलांच्या मंत्रिपदामुळे पक्षाच्या राजकारणाला बळकटीची अपेक्षा...

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी ज्या खातेदारांकडून जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत त्यांना मोबदला वाढवून मिळावा. करवीर तालुक्याचे विभाजन, कोल्हापूर हद्दवाढ, सर्वाना प्रापर्टीकार्ड मिळावे, शासकीय जागेवर असलेल्या झोपडपट्टीधारकांनाही प्रापर्टीकार्ड मिळावे तसेच गायरान जमिनीबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. जिल्ह्यातील वाळू उपसा, दगड खाणी बंद असल्याने त्याचा विकास कामांवर परिणाम होत असल्याने या सुरु करण्यासंदर्भात राज्यस्तरावरुन निर्णय व्हावा अशी मागणी खासदार माने यांनी या बैठकीत केली.

जिल्हाधिकारी रेखावार यांनी शासकीय महसूल वसुली, महाराजस्व अभियांतर्गत लोकजत्रा उपक्रमांतर्गत घेतलेले शिबीर, 7/12 संगणकीकरण, ई पीक पाहणी, पाणंद रस्ते, शेतरस्ते, शिवार, शिव रस्ते मोकळे करणे, पीएमकिसान, महसूल विभागाकडील रिक्त पदे, पुरामुळे बाधित गावे, जिल्ह्यातील धरणातील पाणी साठा, आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध मनुष्यबळ व सामग्री, संभाव्य पूर परिस्थितीचे नियोजन, अतिवृष्टी व पुरामुळे शेत पिकांचे नुकसान याबाबतची सविस्तर माहिती मंत्री विखे पाटलांना दिली. आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे व नागरिकही सजग असल्याने पुरात हानी टाळण्यात प्रशासनास यश आले असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्याकडे प्रशिक्षीत मनुष्यबळ व पुरेशी साधन सामग्री उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil in Kolhapur
धनंजय महाडिक राज्यसभेवर गेल्याने कोल्हापूर लोकसभा कोण लढवणार? चंद्रकांतदादांनी स्पष्टच सांगितले

विखेंचे देवदर्शन

राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूरचे अंबाबाई व वाडीरत्नागिरीचे जोतिबांचे दर्शन घेतले. तसेच वारणा उद्योग समुहाला भेट देऊन पाहणी केली. खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com