
Kolhapur Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची (रविवार ता.९) कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. या सभेची राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार तयारी केली आहे. या सभेला एक लाख लोक येणार असल्याचा दावा त्यांनी केला. सभेच्या माध्यमातून मुश्रीफ कोल्हापुरातील आपल्या ताकदीचे दर्शनही घडणार असल्याची चर्चा आहे.
हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्ष फक्त कागल पुरता मर्यादीत ठेवला असा आरोप त्यांच्यावर शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी केला होता. त्या आरोपालाही मुश्रीफ कोल्हापुरच्या सभेतून जोरदार उत्तर देणार आहेत, तसे सूतोवाच त्यांनी केले. मुश्रीफ म्हणाले, एक लाखभर कार्यकर्ते उद्या तपोवन मैदान येथे उपस्थित राहणार आहेत. मी राष्ट्रवादी कागल पुरतीच मर्यादित ठेवली का ? याचे उत्तर उद्याच्या सभेत मिळेल. सभेला राष्ट्रवादीचे नऊ मंत्री, लाखभर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे होत आहे. हसन मुश्रीफ यांनी तपोवन मैदानात होणाऱ्या सभेच्या ठिकाणी तयारीचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. कोल्हापुरातील सभा म्हणजे देशात प्रथम अशी जंगी सभा होत आहे. मी यापूर्वी अशी तयारी कधीही पाहिली नाही. या सभेत जिल्ह्यातून 1 लाख लोक येतील. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग असेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ते कोल्हापुरात आले. पण त्यावेळी सत्कार करण्यासाठी वेळ मिळाला नाही. पण उद्या अजित पवार यांचा जाहीर सत्कार आणि सभा होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणूनही सभा आयोजित केली असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूरच्या सभेत शरद पवार साहेबांचा फोटो नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर मुश्रीफ यांनी आम्ही शरद पवार साहेबांसोबत आहोत, त्यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो. मात्र, त्यांनी आम्हाला फोटो वापरायचे नाही. असे सांगितल्यानंतर तशा वरिष्ठांकडून फोटो न वापरण्याच्या सूचना आल्या असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.