KDCC Election : पाटील-मुश्रीफांनी सत्ता राखली...पण, आवाडे-कोरे गटाचा कार्यक्रम कोणी केला?

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सत्तारुढ मुश्रीफ-पाटील गटाने जिंकल्या 18 जागा; शिवसेनेचा तीन जागांवर विजय
kdcc bank election
kdcc bank electionsarkarnama

कोल्हापूर : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (केडीसीसी) (kdcc bank) निवडणुकीत सत्तारूढ आघाडीने 21 पैकी 18 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला, तर दिग्गज नेत्यांना टक्कर देत शिवसेनाप्रणित समविचारी आघाडीने 3 जागा काबिज केल्या आहेत. सत्तारूढ गटाच्या सहा जागांच्या उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आबिटकर यांचा भाऊ प्रा. अर्जुन आबिटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांना पराभवाचा धक्का देत बॅंकेत प्रवेश केला, तर प्रक्रिया गटातील निवडणूक ही नुरा कुस्तीप्रमाणे होणार असल्याची चर्चा अगोदरपासून होती. खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या विजयामुळे या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. (Mushrif-Patil group wins 18 seats in Kolhapur District Bank)

कसबा बावडा रमण मळा येथील शासकीय धान्य गोदाममध्ये आज (ता. ७ जानेवारी) सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी पाऊणला मतमोजणी संपली, त्यानंतर विजयी उमदेवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आपापल्या नेत्यांचा जयघोष करत गुलालाची उधळण केली. 

kdcc bank election
पवारांची काका साठेंना पदावर राहण्याची सूचना : बारामतीपर्यंत तक्रारी कोणी केल्या?

कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी बुधवारी (ता. 5 जानेवारी) चुरशीने 98 टक्के मतदान झाले होते. पंधरा जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात होते, त्यासाठी 7 हजार 498 मतदारांनी मतदान केले होते. आज सकाळी 8 ते 9.30 दरम्यान सर्व टेबलवर गटनिहाय मतपत्रिकेचे वाटप करण्यात आले. कडाक्‍याच्या थंडीतही अधिकारी आणि त्यांच्यासोबत उमेदवारांचे कार्यकर्ते मतमोजणी ठिकाणी हजर झाले होते.

kdcc bank election
शिवसेना खासदाराच्या मातोश्री पक्षाविरोधात लढल्या अन् दणक्यात निवडूनही आल्या

पहिला निकाल आजरा विकास संस्था गटाचा जाहीर झाला. यामध्ये सत्तारूढ गटाचे सुधीर राजाराम देसाई हे 57 मते घेऊन विजयी झाले. तर, त्यांच्या विरोधातील उमेदवारास 48 मते मिळाली. त्यानंतर भुदगड विकास संस्थेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये माजी आमदार के. पी. पाटील यांचा मुलगा रणजितसिंह पाटील (सत्तारूढ) विजयी झाले. रणजितसिंह पाटील यांना 144, तर यशवंत केरबा पाटील (विरोधी गट) यांना 62 मते मिळाली. नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे यांना पराभूत करून विरोधी आघाडीचे व आमदार प्रकाश आबिटकर यांचे भाऊ प्राचार्य अर्जुन आबिटकर विजयी झाले. आबिटकर यांना 613, तर आवाडे या 463 मते मिळाली. याच गटातील अनिल पाटील यांना 107 मतांवर समाधान मानावे लागले.

kdcc bank election
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवसेनेसोबतच! खासदार मंडलिकांनी टाकला डाव

सर्वात चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेली कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था गटामध्ये विरोधी आघाडी पॅनेलचे प्रमुख खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सत्तारूढ गटाच्या प्रदीप पाटील व मदन कारंडे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. खासदार मंडलिक यांना 306, बाबासाहेब पाटील यांना 329, प्रदीप पाटील-भुयेकर यांना 119 तर मदन कारंडे यांना 122 मते मिळाली आहेत. इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून सत्तारूढचे प्रदीप उर्फ भैया माने 2265 मते घेवून विजयी झाले. त्याच्या विरोधी उमदेवार क्रांतीसिंह संपतराव पवार-पाटील यांना 1655 मते मिळाली. गडहिंग्लज संस्था गटात संतोष पाटील 100 मते घेऊन विजयी झाले, तर माजी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांना केवळ 6 मतांवर समाधान मानावे लागले. पन्हाळा संस्था गटात आमदार विनय कोरे 204 मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी विजयसिंह पाटील यांना 38 मते मिळाली.

kdcc bank election
आमदार प्रकाश आवाडेंना पराभवाचा धक्का; आबिटकर ठरले जायंट किलर

शाहू संस्था गटातून अपक्ष उमेदार रणवीरसिंह गायकवाड 66 मते घेवून विजयी झाले, तर पराभूत सर्जेराव पाटील-पेरीडकर यांना 33 मते मिळाली. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शिरोळ संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे 98 मते मिळवून विजयी झाले. त्यांच्याविरूध असणारे गणपतराव पाटील यांना 51 मते मिळाल्याने पराभव पत्कारावा लागला. महिला राखीव गटामध्ये ऋतिका शाहू काटकर 4575 व माजी खासदार निवेदिता माने 4149 मते घेऊन विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात असणाऱ्या तलिका पांडुरंग शिंदे यांना 2966 आणि रेखा सुरेश कुऱ्हाडे यांना 2079 मते मिळाल्याने त्यांना पराभव पत्कारावा लागला.

kdcc bank election
KDCC Bank Result : खासदार मंडलिकांनी विनय कोरेंना आपली ताकद दाखवून दिली...

अनुसूचित जाती व जमाती गटात आमदार राजू आवळे 5002 मतांनी विजयी झाले, तर उत्तम कांबळे 2393 मतांनी पराभूत झाली. विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्गमध्ये स्मिता गवळी यांनी पहिल्याच टर्ममध्ये बाजी मारत 4887 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या विरोधी विश्‍वास जाधव हे 2495 मते घेवून पराभूत झाले. इतर मागासवर्गीय गटातून विजयसिंह माने 4631 मते घेवून विजयी झाले, तर रवींद्र मंडके 2750 मते घेवून पराभूत झाले. जिल्हा बॅंकेची मतमोजणी अत्यंत शिस्तबध्द व शांततेत झाली. अधिकाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे मतमोजणी वेळेत पूर्ण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com