अल्पवयीन मुलीचा खून : जवळे ग्रामस्थ संतापून रस्त्यावर

पारनेर तालुक्यातील ( Parner ) जवळे येथे अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, ही आत्महत्या की खून, याबाबत मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच समजणार आहे.
Crime
CrimeSarkarnama

पारनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील सतत घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा सुव्यवस्थे बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात अशीच घटना जवळे येथील अल्पवयीन मुलीच्या बाबत घडली आहे. Murder of a minor girl: Nearby villagers angry on the road

जवळे येथे अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, ही आत्महत्या की खून, याबाबत मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच समजणार आहे. मात्र, याबाबत गावात वेगवेगळी चर्चा आहे. पारनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Crime
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

दरम्यान, काल ( बुधवारी) रात्री उशिरा पोलिसांनी चार संशियतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी ः काल (ता. 20) दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान गावाजवळच असलेल्या वस्तीवर एका अल्पवयीन मुलीचा घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले. या मुलीचे आई-वडील मजुरी करून आपला चरितार्थ चालवितात. नेहमीप्रमाणे ते मजुरीसाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास मुलीचा लहान भाऊ क्लासला गेला. त्यानंतर या मुलीचा घातपात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. कारण, दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पारनेर पोलिस ठाण्यात तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Crime
नगरमधील शिवसैनिकांतील वाद कसा थांबणार...

आम्ही त्या मुलीच्या मैत्रिणींकडे, तसेच आसपासच्या लोकांकडे चौकशी केली आहे. काहीच माहिती मिळत नाही. तिच्या मैत्रिणींनी, आमचे दुपारी 12 वाजेपर्यंत फोनवरून बोलणे झाले, असे सांगितले. मात्र त्यानंतर काय झाले, हे समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नगर येथील सरकारी रुग्णालयात पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजणार आहे. जिथे तिचा मृतदेह मिळाला, तेथील वस्तू संरक्षित करून ठेवल्या आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. घटनेचा लवकरच तपास लागेल, अशी माहिती पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांनी दिली. शवविच्छेदनाचा अहवाल अजूनही आलेला नाही.

Crime
विधान परिषदेसाठी बिगूल : मतदारयादीचे निकष जाहीर; मुदत संपलेले नगरसेवक हळहळले

ग्रामस्थांचा रस्ता रोको

कालच्या ( बुधवार ) घटनेनंतर जवळे ( ता. पारनेर ) ग्रामस्थांनी घटनेचा तपास लवकरात लवकर करून आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com