Mumbai : माथाडींच्या समस्या सोडवा, अन्यथा लाक्षणिक संप : नरेंद्र पाटलांचा इशारा

Mathadi Kamgar माथाडी कामगारांच्या कामगार,गृह, पणन व सहकार आणि संबंधित खात्याअंतर्गत असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार एक फेब्रुवारीला लाक्षणिक संप करतील.
Mathadis Melava Mumbai
Mathadis Melava Mumbaisarkarnama

Narendra Patil News : 'अनेक मोर्चे, आंदोलने केली. शासनाच्या विविध खात्यांकडे आणि मंत्र्यांकडे पाठपुरावाही केला. मात्र, शासन माथाडी कामगारांच्या Mathadi Kamgar समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणूनच आता सरकारने माथाडींच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कार्यवाही केली नाही, तर येत्या एक फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहे,'असा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी आज दिला.

माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नी चर्चा करून आंदोलनाबाबत निर्णय घेण्यासाठी आज नवी मुंबईतील माथाडी भवनात आयोजित मुकादम व कार्यकर्त यांच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले,‘‘माथाडी कामगारांच्या समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष पसरला असून, तमाम माथाडी कामगार लाक्षणिक संप पुकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. सल्लागार समितीची पुर्नरचना करावी.

पुर्नरचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणुक करावी. सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुर्नरचना करावी. विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन पुर्नरचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणूका कराव्यात.माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे. अनुज्ञाप्तीधारक तोलणार मापाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घ्यावे.

Mathadis Melava Mumbai
Satara : मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी गृहखात्याने संबंधितांची समिती गठीत करावी व पोलीस संरक्षणाचे नवीन परिपत्रक पोलीस यंत्रणेकडून त्वरीत काढावे आदी विविध मागण्यांबाबत संघटनेने सतत पाठपुरावा केला आहे. शासनाने मात्र, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच माथाडी कामगारांच्या कामगार,गृह, पणन व सहकार आणि संबंधित खात्याअंतर्गत असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार एक फेब्रुवारीला लाक्षणिक संप करतील.’’

Mathadis Melava Mumbai
Mumbai News: मुंबई आणि शिवसेना, हे नाते आजपर्यंत कुणी तोडू शकले नाही, आणि...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com