मोदी सरकारने आतातरी धडा घ्यावा; जनमताचा आदर करावा!

कृषी कायदे मागे घेण्यावरून खासदार विनायक राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
Vinayak Raut-Narendra Modi
Vinayak Raut-Narendra ModiSarkarnama

पंढरपूर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु यातून आता तरी केंद्र सरकारने धडा घ्यावा, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्षाला लगावला आहे. (MP Vinayak Raut criticizes Prime Minister Narendra Modi on withdrawing agricultural laws)

खासदार विनायक राऊत हे शनिवारी (ता. 20 नोव्हेंबर) विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत मोदी सरकारने या पुढे जनमताचा आदर करूनच निर्णय घ्यावेत, असेही सुनावले.

Vinayak Raut-Narendra Modi
भीमा-पाटस अखेर भाड्याने चालवायला देणार : पण घेणार कोण याकडे लक्ष!

खासदार राऊत म्हणाले की, मोदी सरकारने घटक पक्षांना व विरोधकांना विश्वासात न घेता शेतकरीविरोधी कृषी कायदे केले होते. या कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्याचीच परिणीती म्हणून केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले. यापुढे तरी केंद्र सरकारने यातून धडा घ्यावा. असे निर्णय घेताना सर्व पक्षांना विश्वासात घेतले‌ पाहिजे. एसटी कामगारांच्या संपाबाबत खासदार राऊत म्हणाले की, एसटीच्या कामगारांनी आता जास्त ताणू नये. विलिनीकरणाऐवजी इतर सुविधा घ्याव्यात. लवकरच एसटी संपावर तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Vinayak Raut-Narendra Modi
रामदास कदमांना शिवसेनेने भरभरून दिलंय; सुनील शिंदेंची उमेदवारी योग्यच!

राज्य सरकारला उत्पन्नाचे असे कोणतेही मोठे साधन नसल्यामुळे सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही सवलत देणे शक्य नाही. केंद्र सरकारने 56 हजार कोटींचा जीएसटी थकवला आहे, त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. शेतीपंपासह इतर वापराची सुमारे 75 हजार कोटींची वीजबिलाची रक्कम थकीत आहे. ती वसूल होणे गरजेचे आहे, असे सांगत शेतकऱ्यांच्या वीजजोड तोडणीचे खासदार राऊत यांनी‌ समर्थन केले. सगळी थकबाकी वसुली झाली तरच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत विचार होऊ शकतो, असेही खासदार राऊत यांनी म्हटले. या वेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, माजी उपजिल्हा प्रमुख महेश साठे, जयवंत माने, पंढरपूर शहरप्रमुख रवी‌ मुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com