Koregaon : खासदार उदयनराजेंच्या भूमिकेचे शालिनीताईंकडून स्वागत...

Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केलेल्या राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
Dr. Shalinitai Patil, MP Udayanraje Bhosale
Dr. Shalinitai Patil, MP Udayanraje Bhosalesarkarnama

कोरेगाव : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्याखाली शिक्षा व्हावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली असून, त्यांनी केलेल्या या मागणीचे माजी महसूलमंत्री डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी व्यक्तिगत आणि जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २५ हजार सभासदांच्या वतीने एका पत्रकाद्वारे स्वागत करत उदयनराजेंचे अभिनंदनही केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केलेल्या राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधून पुन्हा राज्यपालांवर तोफ डागली. इतर सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. तसेच महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्याखाली शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. या मागणीचे डॉ. शालिनीताई पाटील यांनी स्वागत केले आहे.

डॉ. श्रीमती पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेल्या उदयनराजे यांनी नुकतेच महापुरुषांचा अपमान करणारे जे वक्तव्य करतील, त्यांना देशद्रोहाच्या कायद्याखाली शिक्षा व्हावी आणि पक्षानेही त्याची गंभीरपणाने दाखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Dr. Shalinitai Patil, MP Udayanraje Bhosale
Satara : लोढांचे अज्ञान; त्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करा...शशिकांत शिंदे

पक्ष म्हणजे ते स्वतः आज ज्या पक्षात आहेत, तो पक्ष. चार दिवसांपूर्वी उदयनराजेंनी देशाच्या पंतप्रधानांना याबाबत पत्र लिहिले आणि महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांच्या युतीचे सरकार आहे. त्यांनी गंभीरपणाने या विषयाकडे पाहावे, अशी राज्यातील आम जनतेची अपेक्षा आहे, असेही पत्रकात शेवटी नमूद केले आहे.

Dr. Shalinitai Patil, MP Udayanraje Bhosale
उदयनराजे भावूक; 'शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असेल तर मी मेलो असतो ते परवडलं असतं'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com