
Satara Political News: रंगीबेरंगी कपडे, हटके स्टाईल अन् शीघ्र कविता यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक न्यायमंत्री न्यायमंत्री रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. आठवले यांना चटकन कविता सुचते. भाषणाला सुरुवात केली, की श्रोते त्यांना कवितांचा आग्रह धरतात. आणि जनतेच्या आग्रहाचा आदर करत, आढेवेढे न घेता, ते आपली कविता सादर करतात. पण साताऱ्यात आठवलेंच्या उपस्थितीत भाजपचे खासदार उदयनराजेंनी त्यांच्यासाठी मिश्किल कविता सादर केली अन् उपस्थितांमध्ये हशा पिकला. आठवलेंनाही हसू आवरता आले नाही. (Latest Marathi Political News)
“आमच्या मनात आहेत, रामदासजी आठवले…म्हणूनच आम्ही त्यांना गटवले…” उदयनराजेंची ही मिश्किल कविता सादर करताच व्यासपीठावरील सर्व नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.रविवारी साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आरपीआयचं पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात उदयनराजेंनी ही कविता ऐकवली.
“मला कविता करता येत नाहीत. पण दिल्लीला गेल्यावर मी रामदास आठवलेंकडून कविता शिकून घेतो. म्हणजे पुढच्या वेळी आणखी चांगल्याप्रकारे कविता सादर करता येईल” असे उदयनराजेंनी म्हणताच पुन्हा सभागृहात हशा पिकला.
स्थानिक कार्यक्रम असो की राज्यसभा आठवलेंच्या कवितांची भुरळ उपस्थितांना असते. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना त्यांच्या कवितांची क्रेझ आहे. फेसबुकवर "रामदास आठवलेंच्या कविता" नावाने एक पेजही आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आठवलेंच्या कवितांचे कौतुक केलं आहे. एका कार्यक्रमात फडणवीस आठवलेंना म्हणाले होते की तुमची जिंदादिली आणि तुमच्या कविता मला आवडतात. (MP Udayanraje Poem On Ramdas Athawale)
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.