मी दुचाकीवरून जाईन नाहीतर, शीटवर उभा राहून जाईन; दुःख वाटत असेल तर तुम्ही करा...

कामे केली असती तर लोकांनी नाव ठेवली नसती. हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हान देऊन ते म्हणाले, आव्हान दिले की त्यावेळेस त्यांना वेळ नसतो.
मी दुचाकीवरून जाईन नाहीतर, शीटवर उभा राहून जाईन; दुःख वाटत असेल तर तुम्ही करा...
Udayanraje Bhosale, Shivendrarje Bhosaledesign@apglobale.com

सातारा : जनतेला कामे पाहिजेत, कामे करायची नाहीत आणि मग ते याच्यावरून गेले, त्याच्यावरून गेले अशी टीका करायची. मी दुचाकीवरून जाईन किंवा शिटवर उभा राहून जाईन. मी लोळत जाईन नाहीतर गडगडत जाईन. याबद्दल कोणाला दुःख वाटत असेल तर तुम्हीही असे करा, लोकशाही आहे, असे प्रतिउत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना प्रतापगडावरून दिले आहे.

प्रतापगडावर भवानी मातेची आरती व दर्शनासाठी खासदार उदयनराजे भोसले तेथे गेले होते. या कार्यक्रमानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या टीकेवरून विचारले असता खासदार उदयनराजे भोसले यांनी सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले, मला चारचाकी परवडत नाही, म्हणून मी दुचाकीवरून फिरतो. मी कसे फिरावे हे मी ठरवेन. मी चालत फिरेन, रांगत फिरेन. कारण माझे गुडघे दुखतात. काही राज्यांत सुटका झाली की लोक लोटांगण घालत मंदीराला प्रदक्षिणा मारतात. त्यानुसार मी गडगडत जाईन, तुमचा प्रॉब्लेम काय.

Udayanraje Bhosale, Shivendrarje Bhosale
पाच वर्षांत कामे केली असती तर, दुचाकीवर फिरावे लागले नसते...

याबद्दल कोणाला दुःख वाटत असेल तर त्यांनीही असे करावे, कारण लोकशाही आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. आम्ही कोणतीही गोष्ट केली तरी करताना जनतेला कामे पाहिजेत. कामे करायचे नाहीत आणि मग नावं ठेवायची ह्याच्यावरून गेले त्याच्यावरून गेले. कामे केली असती तर लोकांनी नाव ठेवली नसती.

Udayanraje Bhosale, Shivendrarje Bhosale
ज्यांना शिव्या देता, त्यांच्याशीच बँकेवर घेण्यासाठी चर्चेला जाता....

हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हान देऊन ते म्हणाले, आव्हान दिले की त्यावेळेस त्यांना वेळ नसतो. आमची नियोजित कामे होती, असे सांगतात. पण, माझा फक्त एकच पूर्व नियोजित कार्यक्रम असतो. सर्वसामान्य आणि जनतेची सेवा करणे. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. आपली सर्वांची प्रगती व्हावी, देशाची प्रगती व्हावी, जेणे करून मला दुचाकीवरून पुन्हा चारचाकीवरून जाता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.