आम्ही पाणी देतो, आम्ही पाणी पाजत नाही; उदयनराजेंचा माजी पालकमंत्र्यांना टोला

शाहुपूरीसह २२ गावांतील लोक पाण्यापासून वंचित राहिले. पण शाहुपूरीचे नेते संजय पाटील, ॲड. दत्तात्रेय बनकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून ही योजना मार्गी लागली आहे.
आम्ही पाणी देतो, आम्ही पाणी पाजत नाही; उदयनराजेंचा माजी पालकमंत्र्यांना टोला
Udayanraje Bhosale, Shashikant Shindefaccebook

सातारा : तत्कालिन आमदार व पालकमंत्र्यांनी शाहुपूरीसह २२ गावांसाठी असलेली पाणी योजना श्रेयवादातून हाणून पाडली. त्यामुळे आम्हाला खूप वेदना झाल्या. पण आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेऊन ही योजना मार्गी लावली आहे. आम्ही पाणी देण्याचे काम करतो, पाणी पाजण्याचे काम करत नाही, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते व तत्कालिन पालकमंत्री शशीकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

शाहुपूरी परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी या परिसरातील नागरीकांच्यावतीने उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते व तत्कालिन पालकमंत्री शशीकांत शिदेंवर निशाणा साधला. उदयनराजे म्हणाले, केवळ श्रेय आम्हाला मिळेल या भावनेतून ही योजना हाणून पाडली. मला त्यावेळी खुप वेदना झाल्या, त्यावेळी ते आमदार पालकमंत्री होते. त्यांची भेट घेऊन मी त्यांना ही योजना पूर्ण झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली.

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
अजित पवार व शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामतीत बंद खोलीत चर्चा

त्यानंतरच निवडणूका झाल्या व सत्तांतर झाले. शाहुपूरीसह २२ गावांतील लोक पाण्यापासून वंचित राहिले. पण शाहुपूरीचे नेते संजय पाटील, ॲड. दत्तात्रेय बनकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून ही योजना मार्गी लागली आहे. दिवाळीपूर्वी या पाणी योजनेचे काम सुरू होईल. आम्ही पाणी देण्याचे काम करतो, पाणी पाजण्याचे काम करत नाही, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. शाहुपूरीचा हा परिसर सुंदर करण्यावर भर देऊ या. ग्लोबल वॉर्मिंग सुरू असून त्याचे परिणाम म्हणून अतिवृष्टी होत आहे. खुल्या जागेत वृक्षारोपण करावे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.