त्यांना मुस्काडले पाहिजे; त्यांचे नाव घेणे म्हणजे तोंडाला वास येईल : उदयनराजेंचा अजित पवारांवर घाणाघात

छत्रपती शाहू जिल्हा क्रिडा संकुलातील असुविधेबाबत उदयनराजे भोसले आज येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या तत्कालिन नेत्यांवर टीकेची झोड उठवली.
udayanraje Bhosale, Ajit Pawar
udayanraje Bhosale, Ajit Pawarfacebook

सातारा : स्पोर्टसमध्ये सातारा जिल्ह्याचे नेते व आमदार, खासदारांनी वाटोळे करून टाकले आहे. जिल्हा क्रिडा संकुलात आपण रणजीच्या मॅचेस्‌ किंवा ॲथलेटिक्सच्या स्पर्धा घेऊ शकत नाही. ज्यांच्या काळात हे क्रिडा संकुल बांधले, त्यावेळी जे पालकमंत्री होते, त्यांनी याचे उत्तर द्यावे. प्रत्येक वेळी मी केलं नाही, मी ते केलं नाही, असे सांगत आहेत. मुस्काडले पाहिजे त्यांना. त्यांचे नाव घेणे म्हणजे माझ्या तोंडाला घाण वास येईल, अशी घाणाघाती टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून केली.

छत्रपती शाहू जिल्हा क्रिडा संकुलातील असुविधेबाबत उदयनराजे भोसले आज येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या तत्कालिन नेत्यांवर टीकेची झोड उठवली. खासदार उदयनराजे म्हणाले, जिल्हा क्रिडा संकुलात ॲथेलेटिक्स ट्रक बसत नाहीत. त्याला ॲबलाँग ट्रॅक लागतो. येथे राऊंड ट्रॅक आहेत. त्यावेळी कोण पालकमंत्री होते. तसेच जे जे आमदार मला विरोध करत होते. त्यांना वाटत होते, की मी त्यांना विरोध करतोय. या सगळ्यांना माहिती आहे. हे कोणी केलं आहे. मी त्यांचे नाव घेणे म्हणजे माझ्या तोंडाचा घाण वास येईल. या लोकांना जोड्यापुढे उभे करायच्या लायकीची ही लोक नाहीत. सगळीकडे घाण घाण घाण केली आहे.

udayanraje Bhosale, Ajit Pawar
ज्या विश्रामगृहात वाद झाला.. तेथेच रामराजे आणि उदयनराजे भेटले...

जिल्हा क्रिडा संकुलात साधे तुम्ही रणजी ट्रॉफीची मॅचेस घेऊ शकत नाही. तुम्ही ॲथलेटिक्सचा एक ईव्हेंट घेऊ शकत नाही. ॲथलेटिक्सला राऊंड लागत नाही. ॲबलाँग ट्रॅक लागतो. यांनी सातारला झिरो करायचे ठरविले आहे. ॲबलाँग ट्रॅक करता येईल का, ते पहा, अशी सूचना त्यांनी क्रिडा अधिकाऱ्यांना केली. क्रिडा संकुलातील स्विमिंग पुल लिकेज आहे. तसेच तुमच्याकडून तसेच पालिकेकडून कामांबाबत प्रस्ताव हवे आहेत. साताऱ्याच्या नव्याने हद्दवाढ झाली असली तरी हद्दीच्या बाहेर एमआयडीतील जागेत स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स आपण उभे करू शकतो. एमआयडीसीत जागा शोधण्यासाठी आम्ही गेलो, त्यावेळी सातारा जिल्ह्यातील मोकाट पुढाऱ्यांनी येथील जागा स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत, अशी टीकाही उदयनराजेंनी केली.

udayanraje Bhosale, Ajit Pawar
उदयनराजे गृहनिर्माणमधून लढणार; सभासदांवर अन्याय करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

सातारा स्टेडियमसाठी प्राईम एरिया असूनही ज्याप्रमाणे बालेवाडीत बी. जी शिर्केंनी उत्कृष्ट प्रकारचे स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स बांधले आहे. त्यांनीही सातारा स्टेडियमच्या बांधणीसाठी टेंडर भरले होते. हे सर्व जनतेसमोर आले पहिजे. जेणे करून भविष्यात ही सर्व सो कॉल पुढारी, आमदार व खासदार यातून बोध घेतील. त्यांनी स्पोर्टसमध्ये सातारा जिल्ह्याचे वाटोळे करून टाकले आहे. त्यावेळी जे पालकमंत्री होते, त्यांनी याचे उत्तर द्यावे. प्रत्येक वेळी मी नाही केलं, मी ते केले नाही, असे सांगत आहेत. मुस्काडले पाहिजे त्यांना.

udayanraje Bhosale, Ajit Pawar
उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे समर्थक आमने-सामने; विकास कामांवरून श्रेयवाद रंगला....

ऐन मोक्याची जागा त्यांनी बांधकाम केलंय, आपण स्टेडियमचे टेंडर काढले होते, का व्यापारी संकुलांचे होते, असा प्रश्न त्यांनी पालिका व क्रिडा अधिकाऱ्यांपुढे उपस्थित केला. ही सगळी अकार्यक्षम लोक आहेत. मी स्वतःला अकार्यक्षम म्हणेण. मी केले म्हणता फित कापायला पुढे येत होते. जोड्याच्या बाजूला ठेवण्याच्या लायकीचे हे लोक नाहीत, राग येतोय यांचा. काही करता येत नसेल तर स्पोर्टस्‌च्या लोकांचे वाईट करू नका, कोणत्या जन्मी हे पाप ते फेडणार असा प्रश्नही उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील क्रिडा विषयीच्या प्रश्नांबाबत वेळच्यावेळी बैठका घेत चला, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com