उदयनराजेंची वाढदिवशी मोठी घोषणा; घेतला 'हा' उपक्रम हाती

सातारकरांच्या वतीने खासदार उदयनराजे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
Udayan Raje Bhosale
Udayan Raje Bhosalesarkarnama

सातारा : शिवछत्रपतींनी (Chhatrapati Shivaji Maharaj) उभारलेला स्वराज्यलढा आधुनिक पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणारा मावळ्यांची शाळा या अभिनव उपक्रमाची घोषणा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी आज गांधी मैदानावरून केली. या उपक्रमात इतर जिल्ह्यातील शाळांनीही सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.

खासदार उदयनराजे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मीती इन्फोटेन्मेंटच्या तांत्रिक सहयोगातून मावळ्यांची शाळा या उपक्रमास साताऱ्यातून सुरुवात केली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज बांधणीत योगदान देणाऱ्या राज्यातील स्वराज्य योध्यांच्या वंशजांचा सत्कार करण्यात आला. सातारकरांच्या वतीने खासदार उदयनराजे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी सभापती सुनील काटकर, संग्राम बर्गे, रोहित सावंत, पंकज चव्हाण, स्मिता घोडके, दिपाली गोडसे, सुजाता राजेमहाडिक आदी उपस्थित होते.

Udayan Raje Bhosale
गृहमंत्र्यांच्या धामारीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा धुव्वा!

उदयनराजे म्हणाले, ''ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या गुलामीतून संघर्ष करून बाहेर आलेला आणि गेली ७५ वर्षे स्वातंत्र्य उपभोगत असलेला आपला देश अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. या ही क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहे. मात्र, अजूनही शाळांमध्ये इतिहास हा केवळ एका विषयापर्यंत मर्यादित राहिला आहे. सनावळ, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.

शिवछत्रपतींचा खरा इतिहास आधुनिक तसेच रंजक पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा हा या मागचा आमचा हेतू आहे. मावळ्यांची शाळा या उपक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीने शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्य लढा हा विद्यार्थ्यांपर्यंत पोचवला जाईल. रटाळ सनावळ्या पाठ करून घेण्याच्या रुक्ष प्रथेला खंड देत, प्रोजेक्टर्स आणि व्हिजुअल ग्राफिक्सच्या सहाय्याने आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्य योद्ध्यांच्या शौर्यगाथा शिकविल्या जातील.

Udayan Raje Bhosale
Supriya Sule यांना CM करण्याच्या हालचाली, या चंद्रकांतदादांच्या दाव्यावर त्या म्हणाल्या...

शालेय अभ्यासक्रम ज्या वीर योद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतो. त्या स्वराज्य योद्ध्यांना त्यांच्यापर्यंत अधुनिक पद्धतीने पोचवताना त्यांच्या चारित्र्यातून काय शिकावे? एकूणच शिवचारित्र्यातून कोणते बोध घ्यावा? याचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. मुळात स्वराज्यासाठी काम करणारी लोकच खरे सुपर हिरो आहेत. आपल्या इतिहासाचा विसर आपल्या तरूण पिढीला कधी पडू नये, हा या मागचा आमचा उद्देश आहे. सातारा जिल्ह्यातून अनेक चळवळी उभ्या राहिल्या. आता मावळ्यांची शाळा हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. प्रत्येकाच्या अंतकर्णात इतिहास रुजला पाहिजे. या माध्यमातून प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात याबाबत जागृती करावी, असे त्यांनी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com