सोमय्यांवरील हल्ल्याबाबत उदयनराजे म्हणाले, ही तर झुंडशाहीची नांदी...

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून निषेध
Udayan Raje Bhosale-Kirit Somaiya
Udayan Raje Bhosale-Kirit SomaiyaSarkarnama

सातारा :  भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी निषेध केला आहे. किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. (MP Udayan Raje Bhosale protests the attack on Kirit Somaiya)

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संचेती रुग्णालयात सोमय्या यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक ठरणारा होता. हा हल्ला अतिशय निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

Udayan Raje Bhosale-Kirit Somaiya
जयंत पाटलांचा अलिबागच्या विकासात खोडा : शिवसेना आमदार दळवींचा हल्लाबोल

उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला आहे. त्यामुळे लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन, किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अशा हल्ल्याच्या  घटना घडल्यास त्याचे  कोणीही समर्थन करु शकणार नाही.

Udayan Raje Bhosale-Kirit Somaiya
लतादीदींच्या स्वरमयी प्रवासाचे सोलापूर कनेक्शन...

शिवसेनेच्या पुणे शहराध्यक्षासह ६० ते ७० पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

जम्बो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या हे शनिवारी पुण्यात आले होते. त्यानंतर ते महापालिकेत जात होते, त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले होते, त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या हे खाली पडले होते. या झटापटीत सोमय्या गंभीर जखमी झाले होते.

Udayan Raje Bhosale-Kirit Somaiya
काॅंग्रेस नगरसेवकाला अटक होताच आमदार प्रज्ञा सातव पोलीस ठाण्यात धडकल्या

सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी प्रशांत लाटे यांनी आज (ता. ६ फेब्रुवारी) तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत शिवसेनेच्या ६० ते ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तक्रारीत म्हटले आहे की ‘किरीट सोमय्या हे महापालिकेमध्ये जात असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी व शिवीगाळ केली. पाऱ्यांवर झालेल्या झटापटीत सोमय्या खाली पडले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले व गाडीमध्ये बसवले. त्यांची गाडी महापालिकेच्या आवारातून निघत असताना संजय मोरे त्यांच्या गाडीसमोर झोपले. पोलिसांनी मोरे यांना बाजूला करुन सोमय्या यांची गाडी गेटच्या बाहेर आणली. त्यावेळी शिवसेनेचे ६० ते ७० कार्यकर्ते हातात दगड विटा घेउन उभे होते, हा सोमय्या यांना मारण्याचा डाव होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com