पदमसिंह पाटलांनी शरद पवारांना दिलेली साथ मी आयुष्यभर विसरणार नाही !

डॉ. पदमसिंह पाटील यांनी शऱद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पदमसिंह पाटलांनी शरद पवारांना दिलेली साथ मी आयुष्यभर विसरणार नाही !
Dr. Padamsingh Patil, Supriya Sule, Sharad Pawarsarkarnama

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेर येथील गोरोबा काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदीर प्रशासनाच्यावतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी सुळे यांनी आठवणींना उजाळा दिला.

भाजपचे नेते डॉ. पदमसिंह पाटील (Dr. Padamsingh Patil) व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे ऋणानुबंध हे गेली अनेक वर्षाचे आहेत. सुप्रिया सुळे यांनी डॉ. पदमसिंह पाटील यांच्या आठवणीना यावेळी उजाळा दिला.

Dr. Padamsingh Patil, Supriya Sule, Sharad Pawar
पुण्यातील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत अजितदादा म्हणाले..

'शरद पवार यांच्या चांगल्या वाईट काळात डॉ. पदमसिंह पाटील यांनी पाठीशी उभे राहत साथ दिली. 'डॉ. पाटील यांनी दिलेली साथ मी तरी आयुष्यभर विसरणार नाही,' असे सांगत सुळे यांनी डॉ. पाटील यांच्या विषयी आदर व्यक्त केला.

तेर हे अजित पवार यांची सासुरवाडी असल्याने नाते घट्ट आहे. डॉ. पदमसिंह पाटील यांनी पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यानंतर दोन्ही परिवारात कटुता आली होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिल्याने त्यांची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in