अजितदादांच्या घरी कधी रेड पडली ? राज ठाकरेंच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर..

माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, कदाचित लोकांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल.
ajit pawar, raj  Thackeray, Supriya Sule
ajit pawar, raj Thackeray, Supriya Sulesarkarnama

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या घरावर ईडीची रेड होते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर होत नाही,'' असा आरोप केला होता. त्याला सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) राज ठाकरेंच नाव न घेता सोलापुरात उत्तर दिलं. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

“मला कुणाचीही चूक काढायची नाही. माझा तो स्वभाव नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, कदाचित लोकांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल. त्यामुळे बेसच चुकीचा आहे त्यामुळे तुलना करण्याचा प्रश्नच प्रश्नच येत नाही. उलट मी केंद्र सरकारच्या विरोधात भाषण देते, त्यामुळं माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीयं," असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

ajit pawar, raj  Thackeray, Supriya Sule
धनंजय मुंडेंना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रेणू शर्माला अटक

राज ठाकरे सभेत म्हणाले होते की मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाही. याचं कारण मला कळेल का? त्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मधूर संबंध असतात. हे कसं काय? त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी काही बोलू नये. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानावर काही दिवसांपूर्वी एसटी कामगारांनी आंदोलन केले होते. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांना खासदार सुळे एकट्या मोठ्या हिंमतीने सामोऱ्या गेल्या होत्या.या आंदोलनकर्त्यांमध्ये २२ महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. मात्र या २२ महिलांशीही आता मला चर्चा करायची आहे. त्यासाठी मी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे, असे त्या म्हणाल्या.

ajit pawar, raj  Thackeray, Supriya Sule
बारा तासांतच ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती ; गृहविभागाचा अजब कारभार

सुळे म्हणाल्या, ''ही परवानगी मिळाली तर मी स्वतः चर्चा करेन अन्यथा आमच्या यशस्विनी सामाजिक अभियानाच्या कार्यकर्त्या त्या महिला कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन चर्चा करतील. एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोणी खाऊ, पिऊ घातले, आमच्या घरासमोर आंदोलन करायला कोणी सांगितले? या खोलात न जाता महिला म्हणून त्यांची ही मानसिकता का झाली? त्यांची काय दुख: आहेत? याचा मला शोध घ्यायचा आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com