Satara : 'लम्पी'च्या लसीसाठी खासदार श्रीनिवास पाटलांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

फलटण Phaltan आणि सातारा Satara तालुक्यांतील जनावरांना लागण Infection of animals झाली. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून Animal Husbandry Department लसीकरणाची मोहीम Vaccination campaign हाती घेण्यात आली आहे.
Satara MP Srinivas Patil
Satara MP Srinivas Patilsarkarnama

कऱ्हाड : लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सर्व जनावरांना लसीकरणासाठी आवश्यक ती लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्याकडे केली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री रूपाला यांनी संबंधित लस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पत्राव्दारे खासदार पाटील यांना दिले आहे.

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा वाघेरी येथील जनावरांना प्रादुर्भाव झाला. त्यानंतर फलटण आणि सातारा तालुक्यांतील जनावरांना लागण झाली. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या भागात प्रादुर्भाव झाला आहे, त्या गावांसह परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.

Satara MP Srinivas Patil
Video : शरद पवार नास्तिक कसे असतील? श्रीनिवास पाटील यांचा प्रश्न

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव विशेषतः खिलार जनावरांना होत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने उपचार करण्यापेक्षा आजार येऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे सूचित करण्यात आले आहे. सध्या बाधित जनावरे आणि त्या परिसरातील पाच किलोमीटर अंतरातील जनावरे यांनाच लसीकरण करण्यात येत आहे. सरसकट सर्वच जनावरांचे लसीकरण केले जात नाही.

Satara MP Srinivas Patil
NCP : निवडणुकींत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच गाणं वाजलं पाहिजे... श्रीनिवास पाटील

मात्र, सर्वच जनावरांना लसीकरण केल्यास त्याचा प्रादुर्भाव कमी होईल. यासाठी केंद्र शासनाने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केंद्रीय मंत्री रूपाला यांच्याकडे पत्राव्दारे केली होती. त्यासंदर्भात विचारविनिमय करून मंत्री रूपाला यांनी जनावरांना लस उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन खासदार पाटील यांना दिले आहे. त्यामुळे आता केंद्राकडून लस उपलब्ध होऊन सर्वच जनावरांना लसीकरण करणे शक्य होणार असल्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in