Satara Medical College News: मेडिकल कॉलेजचा प्रश्न खासदार श्रीनिवास पाटलांनी मांडला लोकसभेत....

Mansukh L. Mandaviya केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविय म्हणाले, देशात ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची कामे ठप्प आहेत, त्यांची माहिती मागवली आहे. ती कामे तात्काळ सुरू केली जातील.
MP Srinivas Patil
MP Srinivas Patilsarkarnama

कऱ्हाड : सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली. इमारतीचे काम ठप्प आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करू काम मार्गी लावावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेचे हिवाळी अधिवेशनाच्या प्रश्नोत्तर तासावेळी खासदार श्री. पाटील यांनी ही मागणी केली.

खासदार पाटील म्हणाले, सातारा मेडिकल कॉलेजसाठी यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे. मात्र, त्याठिकाणी मेडिकल कॉलेजसाठी लागणारी इमारत, प्रयोगशाळा, वसतीगृह व अन्य सोयीसुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे ही इमारत, प्रयोगशाळा आणि वसतीगृह होत नसल्याने संबंधित विद्यार्थी कशाप्रकारे शिक्षण घेतील, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ही इमारत होण्यासाठी काही कारणास्तव उशीर होत असेल तर, आवश्यक असल्यास भारत सरकारने एखादी समिती पाठवून याविषयी अंतिम तोडगा काढावा. मेडिकल कॉलेज लवकर सुरू झाल्यास त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत व प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे मेडिकल कॉलेज इमारतीचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली.

MP Srinivas Patil
NCP : निवडणुकींत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच गाणं वाजलं पाहिजे... श्रीनिवास पाटील

खासदार पाटील यांच्या मागणीला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविय म्हणाले, खासदार पाटील यांची सातारा मेडिकल कॉलेज संदर्भातील मागणी योग्य आहे. भारत सरकारच्या सौजन्यातून साताऱ्यात मेडिकल कॉलेजला मंजूरी देण्यात आली. त्याचे बांधकाम करण्याचे काम राज्य शासनाच्या समन्वयातून होते. त्यासाठी केंद्र शासन पाठपुरावा करते. देशात ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची कामे ठप्प आहेत अथवा, संथ गतीने सुरू आहेत, त्यांची माहिती मागवली आहे. ती कामे तात्काळ सुरू केली जातील.

MP Srinivas Patil
सातारा मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रिया; श्रीनिवास पाटलांनी घेतली केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com