'संभाजीराजे अन्‌ शिवसेनेतील हा विषय; इतरांनी त्यात चोमडेपणा करू नये'

खासदार संजय राऊत यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
Sambhajiraje-Uddhav Thackeray-Chandrakant Patil-Sanjay Raut
Sambhajiraje-Uddhav Thackeray-Chandrakant Patil-Sanjay RautSarkarnama

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याचा विषय शिवसेना (shivsena) आणि संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje) यांच्यामधील आहे. इतरांनी त्यात चोमडेपणा करू नये, असा टोला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला. (MP Sanjay Raut criticizes MLA Chandrakant Patil)

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत हे दाेन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज (ता. २८ मे) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना संभाजीराजे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन खरं काय ते सांगावे, असे आवाहन केले होते. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिले.

Sambhajiraje-Uddhav Thackeray-Chandrakant Patil-Sanjay Raut
‘संजय पवारांबरोबरच नंदूरबारच्या शिवसैनिकाचीही राज्यसभेसाठी चर्चा झाली होती’

खासदार संजय राऊत म्हणाले की, कोण चंद्रकांत पाटील, ते काय शिवाजी महाराजांचे वंशज आहेत काय. चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये मोडलेल्या शब्दाचा खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कोणाची आहे. फसवणारे कोण आहेत. २०१९ मध्ये शब्द कोणी दिला होता आणि कोणी मोडला, अशा प्रश्नाचा भडीमार त्यांनी चंद्रकांत पाटलांवर केला. तसेच, या प्रकरणाशी फडणवीस यांचा काय संबंध आहे. त्यांनी ४२ मतं संभाजीराजे यांना द्यावीत. आमच्या पक्षातील निर्णयासंदर्भात आम्ही त्यांना का उत्तरं द्यावीत. फडणवीस आमच्या पक्षात येणार आहेत काय, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

Sambhajiraje-Uddhav Thackeray-Chandrakant Patil-Sanjay Raut
'राज्यसभा पुरस्कृत उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना ‘हे’ सांगितलं होतं!'

राज्यात शिवसंपर्क मोहिमेला मोठा प्रतिसाद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी कमालीची आस्था आणि आदर राज्यातील जनतेला आहे. राज्यातील विरोधी पक्षाची केवळ विरोधासाठी विरोध अशी भूमिका राहिली आहे. शिवसेना किंवा महाविकास आघाडीने राज्याच्या हिताचा एखादा निर्णय घेतला तरी त्याच्यावर टीका करायची. शिवसेनेने व्यक्तीगत पातळीवर काही राजकीय निर्णय घेतले, तरी त्यावर टीका करायची, एवढंच सध्या भाजपकडून केलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ते सातत्याने टीका करत असतात. मनं शुद्ध नसतील, तर असा असुरी आनंद लोकं मिळवत असतात. पण त्याची पर्वा न करता शिवसेना आणि महाविकास आघाडी पुढे जात आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

Sambhajiraje-Uddhav Thackeray-Chandrakant Patil-Sanjay Raut
राज्यसभेसाठी काँग्रेसकडून जयराम रमेश यांना उमेदवारी जाहीर

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरी जागा निवडून आणण्यासाठी आमच्याकडे ४२ पेक्षा जास्त मते आहेत, असा विश्वासही संजय राऊत यांनी या वेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com